Neena Gupta : बॅालीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता कोणत्या कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. वयाच्या २३ व्या वर्षी इंडस्ट्रीत काम करण्यास सुरुवात केलेल्या या अभिनेत्रीला खरी ओळख मिळण्यास काही वर्षांचा काळ जावा लागला. यामागे स्वतः ची चूक असल्याचे अभिनेत्रीने कबूल केले आहे.

खरंतर अभिनेत्री निना गुप्ताला बधाई हो चित्रपटामुळे मोठी प्रसिद्ध मिळाली. या चित्रपटानंतर एकमागून एक चित्रपटांच्या अॅाफर अभिनेत्रीला येत राहिल्या. अनेक चित्रपटांमध्ये तिने कामही केले. मात्र, यश मिळण्यासाठी खूप कालावधी जावा लागला. याबद्दल आता पश्चाताप होत असल्याचे मत अभिनेत्रीने व्यक्त केले आहे.

सध्या ६६ वर्षांच्या नीना गुप्ता बॉलीवूडमधील सर्वात व्यस्त अभिनेत्रींपैकी एक आहेत. वयाच्या २३ व्या वर्षी नीना यांनी १९८२ साली रिलीज झालेल्या साथ साथ चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका केली होती. याबाबत बोलताना अभिनेत्री म्हणाली, “मला अनेकदा प्रश्न पडतो, मी अशी काय चूक केली की मला माझे हक्क इतक्या उशिरा मिळाले?’ मला वाटते की बहुतेकदा ती माझीच चूक आहे. पण आता भूतकाळात रमून जाण्यात काही अर्थ नाही. मला पुढे जायचे आहे.” असे अभिनेत्रीने सांगितले.

१९८२ मध्ये फारुख शेख आणि दीप्ती नवल यांची प्रमुख भूमिका असलेल्या “साथ साथ” चित्रपटात काम करणे ही सर्वात मोठी चूक होती. तिने फारुख शेखची प्रेयसी नीनाची भूमिका केली होती. ती म्हणाली, “साथ साथने मला एक आघाडीची अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध करण्याची संधी हिरावून घेतली.” पुढे अभिनेत्री म्हणाली, मला जाणवले आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या चुका मान्य करता तेव्हा कटुता कमी होते. अन्यथा, तुम्ही जगाला दोष देत राहता आणि ते कधीच संपत नाही. तुमच्या चुका स्वीकारून पुढे जाणे चांगले असल्याचे अभिनेत्री नीना गुप्ता म्हणाली.

हेही वाचा : Kiara Advani: मुलीचा चेहरा न दाखवता कियाराने जिंकली चाहत्यांची मनं, सरायाहची गोड झलक शेअर