Nagar | शेअर मार्केटमुळे झाले कर्ज ; उच्चशिक्षित तरूण राज्यभर करायचा चोऱ्या

नगर, (प्रतिनिधी) – शेअर मार्केटमुळे कर्ज झाल्याने उच्चशिक्षित तरूणाने नगर, पुणे, नाशिक, पालघरसह राज्यभर बंद घरफोडी तसेच चोरी करून लाखोंचा ऐवज लपास करणारा आरोपी कोतवाली पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर परिसरातून ताब्यात घेतला आहे. त्याच्याकडून तब्बल ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
प्रज्वल गणेश वानखेडे (रा. टी.व्ही. सेन्टर घर नं. शाच, २७/३ हडको, श्रीकृष्णनगर जि. छत्रपती संभाजीनगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. संशयीत आरोपीने नगर, नाशिक पुणे, पालघर परिसरात घरफोड्या केल्या असल्याचे तपासात पुढे आले.
तसेच त्याच्याकडून ३ लाख ९८ हजार ५०० सोन्याचा मुद्देमाल व आरोपीने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकुण ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
याबाबत माहिती अशी, केडगाव परिसरात साई गॅलेक्सी अपार्टमेन्ट परिसरात २ जानेवारी २०२४ रोजी बंद घराचे कडी कोयंडा तोडून लाखोंचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली होती.
याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असतांना कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा वानखडे याने केला असल्याचे तांत्रिक विश्लेशनात आढळून आले.
कोतवाली पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार चितेगाव एम आयडीसी परिसरात सापळा रचवून आरोपीस मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. संशयीत आरोपी हा उच्च शिक्षित असल्याने त्याच्या मोबाईल चे लोकेशन वारंवार बदल पोलिसांना चकवा देत असे.
मात्र कोतवाली पोलिसांनी आरोपीचा शोध घेत कारवाई केली. त्याने शेअर मार्केट मध्ये पैसे हरल्याने आरोपीने नाशिक, पुणे, पालघर, नगर परिसरात दिवसा घरफोड्या केल्या असल्याचे तपासात पुढे आले आहे.
ही कारवाई सपोनि योगिता कोकाटे, विकास काळे, कृष्णकुमार सेदवाड व गुन्हे शोध पथकाचे पोहेकॉ योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, विशाल दळवी, सलीम शेख, संदीप पितळे, विक्रम वाघमारे,
सुर्यकांत डाके, मोहन भेटे, नकुल टिपरे, विजय काळे, अभय कदम, अमोल गाढे, सतिष शिंदे, अतुल काजळे, राम हंडाळ, संदीप थोरात, वर्षा पंडीत, सोनल भागवत व दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडु यांच्या पथकाने केली.




