नवीन 138 रुग्णांची नोंद 111 रुग्णांना डिस्चार्ज पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात आज 138 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहरामध्ये 94777 जणांना करोनाची लागण झाली आहे. महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आज चार वाजेपर्यंत शहरातील 138 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर शहराबाहेरील एकाही रुग्णाची आज नोंद झाली नाही. तसेच आज दिवसभरात 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 3 व शहराबाहेरील 3 रुग्णांचा समावेश आहे. शहरातील चिंचवड, काळेवाडी येथील 3 व शहराबाहेरील बारमुला, आंबेगाव, शिरूर येथील 3 रुग्णांचा मृत्यू झाला. आज दिवसभरात 111 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 91493 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 2792 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 1964 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. सद्यःस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 729 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 831 इतकी आहे. जिल्हा रुग्णालयात 12 रुग्णांची प्रकृती चिंताजनक सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात बुधवारी (दि. 16) 3 करोनाबाधित रुग्ण आढळले. रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या 29 जणांपैकी 12 जणांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. टाकवे कान्हेफाटा (ता. मावळ), औंध, वाल्हे (ता. पुरंदर) येथील 3 पुरुष रुग्णांचा करोनाबाधितांमध्ये समावेश आहे. रुग्णालयात आज नव्याने 3 करोना संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. पुण्यातील दोन आणि पिंपरी-चिंचवडमधील एका रुग्णाचा त्यामध्ये समावेश आहे. रुग्णालयातून बरे झालेल्या 639 जणांना आत्तापर्यंत घरी सोडले आहे. एकूण 156 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 304 रुग्णांना उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलविले आहे. 661 जणांना होम क्वॉरटांइन करण्यात आले आहे.