कोरोना विषाणूमुळे इराणमधील खासदाराचा मृत्यू

तेहरान: इराणमध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 145 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान शनिवारी कोरोना विषाणूमुळे खासदार फतेम रहबर (वय 55) यांचे निधन झाल्याची माहिती इराणच्या  सरकारी वृत्तसंस्थाने दिली आहे.

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अलीकडेच तेहरान मतदारसंघाच्या खासदार फतेमह रहबर यांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.

या विषाणूमुळे इराणमध्ये 7 नेते आणि अधिकाऱ्यांना आपला जीव गमावला आहे. कोरोना विषाणूचा प्रसार इराणमध्ये झपाट्याने झाला असून, देशभरात 4,747 लोकांना या विषाणूची लागण झाली आहे.

इराणने कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सर्व शाळा आणि विद्यापीठे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. इराणमच्या 31 विभागात या विषाणूचा प्रसार झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.