पोलीस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू
Updated On:

लोणंद – लोणंद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अतुल श्रीरंग गायकवाड (वय 37) यांचा कोपर्डेनजीक झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. अतुल श्रीरंग गायकवाड हे गमेवाडी (ता. पाटण) येथील मूळ रहिवाशी असून सध्या ते लोणंद पोलीस स्टेशन येथे पोलिस नाईक म्हणून कार्यरत होते.
3 सप्टेंबर रोजी रात्री बारा ते एकच्या सुमारास सातारा येथून टीव्हीएस ज्युपिटर स्कुटर (एम.एच 11- 5435) या दुचाकीवरून ते लोणंदकडे येत होते. यावेळी सालपे हद्दीत कोपर्डे फाटा येथे आले असताना खड्ड्यात गाडी जाऊन पडल्याने ते गंभीर जखमी झाले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी घटनास्थळी पाहणी केली. या प्रकरणी लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सपकाळ अधिक तपास करीत आहेत.





