मुंबई – बॉलीवुड पार्श्व गायन आणि सूफी गायक पापोन यांनी दिल्ली येथे आयोजित सिंगिंग कंसर्ट रद्द केला आहे. पापोन यांनी रद्द करण्यामागेचे कारण आसाम राज्यातील हिंसक वातावरण असल्याचे सांगितले आहे. लक्षात घेण्यासारखे आहे की, ईशान्य भारतात नागरिक कॅब आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आसाम राज्यातील डिब्रूगढ़मध्ये आंदोलनकर्त्यांनी राज्य परिवहन निगमच्या आगाराला आग लावली होती. तसेच आसाम राज्यातील अनेक परिसरामध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर पापोनने ट्विट करत सिंगिंग कंसर्ट रद्द केल्याची माहिती दिली आहे.
Dear Delhi. I am very sorry but I have decided not to do the concert tomorrow at ‘imperfectoshor’ as planned! My home state Assam is burning, crying and under curfew! I won’t be able to entertain you the way I should in my present state of mind!
— papon angaraag (@paponmusic) December 12, 2019
दरम्यान, पापोनने भावुक होऊन ट्विट केले आहे की,’प्रिय दिल्ली, मला माफ करा कारण, मी कंसर्ट नाही घेऊ शकणार या कंसर्टची योजना फार पूर्वीपासून सुरु होती मात्र मी या कंसर्टला रद्द केला आहे. माझे होम स्टेट आसाम हिंसक वळण घेऊन धुमसतोय, रडतोय तेथे कर्फ्यू लावण्यात आला आहे. माफ करा माझ्या राज्याची अशी परिस्थिती असतांना माझी मानसिक स्थिति अशी नाही की आपणास मनोरंजित करू शकेल.