Supriya Sule : “प्रिय दादा, आज राखीपौर्णिमा..”; सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी डोळे पाणावणारी पोस्ट
Supriya Sule : "प्रिय दादा, आज राखीपौर्णिमा...पण यावेळी तू सोबत नाहीस, ही जाणीव मनाला खूप अस्वस्थ करत आहे. सात महिन्यांपूर्वीची ती भीषण सकाळ आणि तुझं अचानक निघून जाणं...यावर आजही विश्वास बसत नाही." अशा शब्दांत आपल्या भावनांना वाट मोकळी करत सुप्रिया सुळे यांनी भावाची आठवण काढली आहे.

Supriya Sule : भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचा सण म्हणून रक्षाबंधन ओळखला जातो. आज हा सण असल्याने देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवंगत अजित पवार यांच्याबाबत एक भावूक पोस्ट सोशल मीडियावरून शेअर केली आहे.
आजच्या दिवशी म्हणजेच २८ जानेवारी २०२६ रोजी अजित पवार यांचे बारामतीकडे जात असताना विमान अपघातात निधन झाले. त्यांच्यासोबत विमानात असलेल्या पायलेटसह पाच जणांना आपला जीव गमावला लागला. आज या दुर्देवी घटनेला घटनेला सात महिने पूर्ण झाले आहेत.
“प्रिय दादा, आज राखीपौर्णिमा…पण यावेळी तू सोबत नाहीस, ही जाणीव मनाला खूप अस्वस्थ करत आहे. सात महिन्यांपूर्वीची ती भीषण सकाळ आणि तुझं अचानक निघून जाणं…यावर आजही विश्वास बसत नाही.” अशा शब्दांत आपल्या भावनांना वाट मोकळी करत सुप्रिया सुळे यांनी भावाची आठवण काढली आहे.
खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर पवार कुटुंबात दरी निर्माण झाल्याची चर्चा होत होती. मात्र, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या नात्यामध्ये कधीही ही गोष्ट आली नाही. राजकारणाच्या आड कधीही त्यांनी आपले नाते येऊ दिले नाही. भाऊ-बहिणीचं नातं आणि कौटुंबिक जिव्हाळा हा कायम चर्चेचा विषय राहिला आहे.
View this post on Instagram
सुप्रिया सुळे यांची डोळे पाणावणारी पोस्ट
प्रिय दादा, आज राखीपौर्णिमा…पण यावेळी तू सोबत नाहीस, ही जाणीव मनाला खूप अस्वस्थ करत आहे. सात महिन्यांपूर्वीची ती भीषण सकाळ आणि तुझं अचानक निघून जाणं…यावर आजही विश्वास बसत नाही. लहानपणापासून एकत्र वाढताना आपली भांडणं, एकमेकांवरचं प्रेम आणि एकमेकांविषयीचा अभिमान हाच आपल्या नात्याचा पाया होता. आजही वाटतं, तू कुठूनतरी अचानक येशील, राखी बांधून घेशील, बहिणींसोबत गप्पागोष्टी करत पुन्हा कुटुंबात रमून जाशील…तुझ्या नसण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणारी नाही. तू जिथे असशील, तिथून तुझं प्रेम आणि आशीर्वाद असेच सदैव पाठीशी राहू दे…अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी दिवंगत अजित पवार यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.





