Yugendra Pawar Post : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघामध्ये निधन झाल्यानंतर पवार कुटंबात कधीही न भरून निघणारी मोकळी निर्माण झाली आहे. २८ तारखेला अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या अकाली निधानंतर सर्वांनाचा मोठा धक्का बसला. अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना देखील काकाच्या अकाली निधानाने अतिव दुःख झाले. त्यांनी एक्सवरून ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. काय म्हणाले युगेंद्र पवार? प्रिय अजितकाका, तुम्हाला बघत-बघत, मी लहानाचा मोठा झालो. तुमच्याकडे पाहत तुमच्यासारखं बनण्याचं स्वप्नं मनात बाळगलं. तुमच्यापासूनच प्रेरणा घेऊन, तुम्हाला माझा अभिमान वाटेल असं आयुष्य जगण्याचा मी सदैव प्रयत्न करीत राहीन. तुमच्या आठवणी सदैव माझ्यासोबत राहतील. मिस यू अजितकाका…! अशा शब्दांत युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्या विषयीच्या आपल्या भावना शब्दांच्या रुपाने व्यक्त केल्या. प्रिय अजितकाका, तुम्हाला बघत-बघत, मी लहानाचा मोठा झालो. तुमच्याकडे पाहत तुमच्यासारखं बनण्याचं स्वप्नं मनात बाळगलं. तुमच्यापासूनच प्रेरणा घेऊन, तुम्हाला माझा अभिमान वाटेल असं आयुष्य जगण्याचा मी सदैव प्रयत्न करीत राहीन. तुमच्या आठवणी सदैव माझ्यासोबत राहतील. मिस यू अजितकाका…! pic.twitter.com/3UckfgRYiA — Yugendra Shrinivas Pawar (@yugendraspeaks) January 31, 2026 काका विरुद्ध पुतण्या लढतीत काकानेच मारली बाजी Yugendra Pawar Post २०२४ मध्ये बारामती विधानसभेच्या निवडणुकीत काका विरुद्ध पुतण्या अशी लढत झाली. अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवारांनी निवडणूक लढवली. निवडणुकीत अजित पवाराच दादा झाले. बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांनी १ लाख १६ हजारांच्या मताधिक्यासह ऐतिहासिक विजय मिळवला. असे असले तरी राजकीय मतभेद कुठेही कुटुंबात आणू दिले नाहीत. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर युगेंद्र पवार यांचा देखील अश्रूंचा बांध फुटला. हेही वाचा : Sharad Pawar : ‘दादांची इच्छा पूर्ण व्हावी, असेच वाटते’; सुनेच्या शपविधीपूर्वी शरद पवारांची प्रतिक्रिया