Manoj Shirure : ‘त्या’ एका पेपरसाठी लाखोंचा सौदा? NEET पेपरफुटी प्रकरणात आता डॉक्टर पालक CBI च्या ताब्यात
Manoj Shirure :शिरुरे यांना अटक केल्यानंतर या प्रकरणात आणखी चौकशीतून कोणती नवी माहिती समोर येते याकडे लक्ष असणार आहे.

Manoj Shirure : देशभरात खळबळ उडवणारे नीट पेपरफुटी प्रकरण दिवसेंदिवस आणखी गडद होताना दिसत आहे. RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर याला अटक झाल्यानंतर आता आणखी एका व्यक्तीला सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे.
मनोज शिरुरे असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून, ही व्यक्ती पेशाने बालरोगतज्ज्ञ आहे. धक्कादायक बाब म्हणजे मनोज शिरुरे याने शिवराज मोटेगावकरकडून स्वतःच्या मुलासाठी पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे.
आतापर्यंतच्या सीबीआयच्या कारवाईतील ही पहिली अटक आहे, जी एखाद्या विद्यार्थ्याच्या पालकाला झालेली आहे. शिरुरे यांना अटक केल्यानंतर या प्रकरणात आणखी चौकशीतून कोणती नवी माहिती समोर येते याकडे लक्ष असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयकडून मनोज शिरुरेला लातूरहून चौकशीसाठी पुण्यात बोलण्यात आले होते. चौकशीनंतर सीबीआयने मनोज शिरुरेला अटक करण्यात आली.
सीबीआयच्या तपासात शिरुरे यांनी मोटेगावकरडून मुलासाठी पेपर खरेदी केल्याचा आरोपा करण्यात आला असून यासाठी मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता आहे.
सीबीआयकडून वेगावे तपास सुरू
RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर याच्या नेटवर्कमधील संशयितांवर तपास यंत्रणांचे लक्ष केंद्रीत केले आहे. रविवारीपासून लातूरमध्ये सीबीआयचे पथक तळ ठोकून आहे.
सीबीआयच्या पथकाने औसा रोड परिसरातील सिद्धिविनायक बाल रुग्णालय येथे जात बालरोग तज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांची फुटलेला NEET पेपर विकत घेतल्याच्या संशयावरून तब्बल साडेचार तास कसून चौकशी केली.
चौकशीदरम्यान काही कागदपत्रे, मोबाईल आणि डिजिटल पुरावे CBI ने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात अटकेत असलेल्या मनीषा मांढरे यांची देखील कसून चौकशी सुरू असून, पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधे जाऊन सीबीआयच्या पथकाने तपासणी केली. कारण मनीषा मांढरे याच मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राध्यापिका म्हणून काम पाहात होती. मनीषा मांढरे यांच्या कपाट, लॉकर, डेस्क या सगळ्याची सीबीआयने तपासणी केली. मॉडर्न महाविद्यालयातील अधिकाऱ्यांकडे देखील चौकशी करण्यात आली आहे.
सर्व प्रश्न तोंडपाठ
मनीषा मांढरेनी आपल्या स्मरणशक्तीचा वापर केला. त्यांना सर्व प्रश्न तोंडपाठ होते. त्यांनी कोणताही पुरावा मागे सोडलेला नाही. मनीषा मांढरेनेच्या या ट्रिकने सीबीआयही च्रकावली. दरम्यान, नीट पेपेरफुटीतील अन्य आरोपी मनीषा वाघमारे हिने चौकशीत मनीषा मांढरेचं नाव घेतलं आहे. त्यानंतर सीबीआयने मनीषा मांढरेला अटक केली होती. त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.






