बीएस-4 वाहनांच्या विक्रीसाठी 24 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने बीएस-4 वाहनांच्या विक्रीसाठी 24 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ऑटो क्षेत्राला काहीसा दिलासा मिळाला आहे.  सरकारने 31 मार्चपर्यंत बीएस 4 वाहनांच्या विक्रीला परवानगी दिली होती. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश लॉकडाउन असल्याने पडून असलेल्या बीएस 4 वाहनांच्या विक्रीला ब्रेक मिळाला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने वाहन उद्योगाला दिलासा देत 24 एप्रिल म्हणजे लॉकडाउन संपल्यानंतरचे अतिरिक्त 10 दिवस मुदतवाढ दिली आहे.

24 एप्रिलपर्यंत बीएस-4 वाहनांची विक्री आणि नोंदणी सुरू असेल. ही मुदतवाढ दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या प्रदूषणामुळे तेथील वाहन वितरकांसाठी नसेल, असेही कोर्टाने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी झाली. देशभरात अद्यापही विविध डिलर्सकडे 6,400 कोटी रुपयांचा बीएसआयव्ही वाहनांचा स्टॉक शिल्लक आहे.

स्टेट बॅंकेचे लॉकर शुल्क वाढले…
देशातील सर्वात मोठी बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) लॉकर ग्राहकांना 31 मार्च 2020 पासून लॉकरमध्ये सामान ठेवणे महाग होणार आहे. एसबीआयने लॉकर शूल्क वाढविला असून, नवीन दर 31 मार्चपासून लागू होणार आहेत. लॉकरच्या आकारानुसार एसबीआयने भाडे शुल्क 500 रुपयांनी वाढवून 2000 रुपये केले आहे. खातेधारकाचे लॉकर कोणत्या शहरात आहे यावर हे शुल्क अवलंबून असणार आहेत.

लहान लॉकरचे भाडे 500 रुपयांवरून 2,000 रुपयांपर्यंत वाढू शकते, तर जास्त मोठया लॉकरसाठी 9,000 रुपयांऐवजी 12,000 रुपये द्यावे लागणार आहे. मध्यम आकाराच्या लॉकरसाठी 1,000 रुपयांवरून 4,000 रुपयांपेक्षा अधिक शुल्क आकारले जाईल. मोठया लॉकरचे भाडे 2 हजार ते 8 हजार रुपयांपर्यंत असेल. लॉकर उघडण्यासाठी केवायसीची कागदपत्रे यामध्ये आधारकार्ड, पॅनकार्ड आणि छायाचित्रांसह सादर करावी लागतात. लॉकरचे भाडे तीन वर्षांसाठी भरण्यासाठी बॅंक निश्‍चित ठेव विचारू शकते. सामान्यत: अर्जदाराला खात्यातून शुल्क कपात करण्यासाठी बॅंकेकडून सूचना देण्यात येते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.