मालमत्ता कर भरण्याची मुदत 30 जून करावी : सजग नागरिक मंच
Updated On:

पुणे(प्रतिनिधी) – पुणे महापालिका 31 मे पर्यंत मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना सवलत देते. मात्र, यंदा करोनाच्या अभूतपूर्व संकटामुळे सुरू झालेल्या लाॅकडाऊनमुळे गेल्या सत्तर दिवसांपासून जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि महापालिका सुध्दा मिळकतकराची बिले घरोघरी पोचवू शकलेली नाही.
अनेकांना आर्थिक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे इच्छा असूनही अनेकांना मिळकतकर भरणे शक्य झालेले नाही. या सर्व पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षापुरती मिळकत करातील सवलतीची 31 मे रोजी संपणारी मुदत वाढवून 30 जून पर्यंत करावी अशी विनंती सजग नागरिक मंचने केली आहे.




