मुंबई : राज्य परिवहन विभागाने उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर आता परिवहन विभागाकडून आता अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. आता वाहनचालकांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत नंबरप्लेट बसवणे बंधनकारक असल्याचे सांगितले आहेत. त्यामुळे आता अनेक वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत देण्यात आलेली ही पाचवी मुदतवाढ असून ही अंतिम असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यानंतर एचएसआरपी नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर पथकाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्याच्या परिवहन आयुक्तांकडून सांगण्यात आले. वाहनांची एचएसआरपी नंबर प्लेट ही एक विशेष प्रकारची हाय सिक्युरिटी प्लेट आहे. क्रोमियम-आधारित होलोग्राम या प्लेटमध्ये असल्याने अनेक प्रकारची होणारी छेडछाड थांबवण्यासाठी वाढीव सुरक्षा मिळते. यामध्ये 10 अंकी पिन कोड असतो, जो वाहनांचा युनिक कोड असतो. HSRP प्लेट्स स्टीलच्या बनवलेल्या असतात आणि त्यांच्यावर लेसर-प्रिंट केलेले क्रमांक असतात, ज्यामुळे त्यांची कॉपी करणे कठीण असते. एकदा ही प्लेट लावल्यानंतर गुन्हेगारांना नंबर प्लेट बदलण्याची संधी मिळणे कठीण होते.