DC vs CSK : दिल्लीने टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय ! ‘जाणून घ्या’ प्लेइंग इलेव्हन

DC vs CSK : दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात दिल्लीचा संघ दोन बदलांसह दाखल झाला आहे. कुलदीप यादव आणि रिकी भुईच्या जागी पृथ्वी शॉ आणि इशांत शर्माला संधी मिळाली आहे. त्याचबरोबर या सामन्यात चेन्नईने आपल्या टीममध्ये कोणताही बदल केला नाही. | DC vs CSK Live Score
🚨 Toss 🚨@DelhiCapitals win the toss and elect to bat first
Follow the Match ▶️ https://t.co/8ZttBSkfE8#TATAIPL | #DCvCSK pic.twitter.com/EeiwAv2VvR
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2024
दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, एनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद. | DC vs CSK Live Score
चेन्नई सुपर किंग्ज : रुतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दीपक चहर, तुषार देशपांडे, मथिशा पाथिराना, मुस्तफिजुर रहमान.
सीएसकेविरुद्ध दिल्लीचा रेकॉर्ड आहे खराब
रविवारी सायंकाळी होणाऱ्या आयपीएल सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघ या मोसमात प्रथमच विजयाची नोंद करण्याचा प्रयत्न करेल. मात्र, सीएसकेविरुद्ध दिल्लीचा रेकॉर्ड चांगला नसल्यामुळे त्याचा मार्ग सोपा होणार नाही. या स्पर्धेत उभय संघांमध्ये आतापर्यंत २९ सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी १९ वेळा सीएसकेने विजय मिळवला आहे, तर दिल्लीने १० सामन्यांत विजयाची चव चाखली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाला गेल्या चार सामन्यांमध्ये सीएसकेचे आव्हान पेलता आले नाही आणि त्यातही त्यांच्या पराभवाचे अंतर 91 धावा, 27 धावा आणि 77 धावांचे आहे. । DC vs CSK Live Score





