खेळ खल्लास ! अंडरवर्ल्ड डाॅन दाऊदला मोदी सरकारचा जबरदस्त दणका

मुंबई – मोदी सरकारकडून फरार अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. दाऊदच्या महाराष्ट्रातील संपत्तीचा लिलाव 10 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. हा लिलाव स्मगलर्स अॅण्ड फाॅरेन एक्सचेंज मॅनिप्युलेटर्स अॅक्ट (SAFEMA) अंतर्गत घेण्यात याणार आहे.
कोरोनामुळे हा लिलाव व्हिडीओ काॅन्फरन्सिंगद्वारे केला जाणार आहे. या लिलावात 7 मालमत्तांपैकी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबाके गावातील 6 मालमत्तांचा समावेश आहे. याआधी देखील दाऊदच्या महाराष्ट्र आणि मुंबईतील अनेक मालमत्तांचा लिलाव झाला आहे. मात्र, 10 नोव्हेंबर रोजी होणारा लिलाव हा आतापर्यंतचा सर्वात मोठा लिलाव असल्याचे सांगण्यात येत आहे.
या मालमत्तांचा होणार लिलाव –
18 गुंठा जमीन – राखीव किंमत 1,38,000 रुपये
20 गुंठा जमीन – राखीव किंमत 1,52,000 रूपये
24.90 गुंठा जमीन – राखीव किंमत 1,89,800 रूपये
27 गुंठा जमीन – राखीव किंमत 2,05,800 रूपये
29.30 गुंठा जमीन – राखीव किंमत 2,23,300 रूपये
30 गुंठा जमीन असलेले घर – राखीव किंमत 6,14,8100 रूपये
यापूर्वी 2018 मध्ये देखील दाऊद इब्राहिमच्या मुंबई येथील मालमत्तेचा लिलाव करण्यात आला होता. हा लिलाव 3.51 कोटी रुपयांवर झाला होता. या लिलावात मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन लोकांनी खूप जास्त बोली लावली होती. यात सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने सर्वात जास्त बोली लावली
आणि दाऊदच्या मालमत्तेचे मालक बनले.





