दौंड -शहरांमध्ये शनिवारी (दि. 6) नव्याने एक करोना बाधित रुग्ण आढळला आहे. एका बाधित रुग्णावर यशस्वीरित्या उपचार करून त्याला घरी सोडल्याची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.
बाधितावर येथील कोवीड सेंटरमध्ये डॉक्टरांकडून उपचार करण्यात येत आहेत. (दि. 6) शहरातील 42 वर्षीय पुरूषास बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र दौंड कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या एका रुग्णावर यशस्वीरित्या उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.