दौंड -रेल्वे विभागाशी निगडित विविध प्रश्नांसंदर्भातकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याअध्यक्षतेखाली व पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापकरेणू शर्मा, वरिष्ठ अधिकारी ओम गुप्ता, वरिष्ठवाणिज्य निरीक्षक सुनील मिश्रा यांच्याउपस्थितीमध्ये विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयपुणे येथे शनिवारी (दि. 23) बैठक पार पडली.
यावेळी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे याच्याकडेदौंड विभागासाठी विविध मागण्या करत दौंड तालुक्याला वाऱ्यावर न सोडण्याची विनंती केली. तसेच राज्यामध्ये पुणे – दौंड दैनंदिन प्रवास करणाऱ्या हजारोप्रवाशांच्या विविध प्रलंबित मागण्या व विविधसमस्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी दौंड शहरातील रेल्वे हद्दीमध्ये राहणाऱ्या सुमारे 670 झोपडपट्टी धारक कुटुंबीयांच्या अतिक्रमणाचा प्रश्नकायमस्वरूपी सोडविण्यात यावा, त्यांचे पुनर्वसन करावेव पुनर्वसन होईपर्यंत रेल्वे हद्दीमध्ये राहणाऱ्या झोपडपट्टी धारकांची घरे खाली करण्यात येऊ नयेत.सुवर्ण चतुर्भुज योजनेच्या माध्यमातून दौंडतालुक्यातील 8 रस्त्यांवरील रेल्वे क्रॉसिंगवर ओव्हरब्रिज रस्ता किंवा भुयारी मार्ग तयार करण्यात यावेत.
पुणे-सोलापूर मार्गावरील दौंड जंक्शन येथे तिसऱ्या मोरीचे काम दोन वर्षांहून अधिक काळापासून प्रगतीपथावर आहे. आवश्यक संरचना आणि पुशिंग बॉक्स तयार आहेत. त्यामुळे संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांनी मेगा ब्लॉकसाठी मंजुरी द्यावी. दौंड हे रेल्वेचे उपनगर म्हणून घोषित करण्यात यावे.पुणे-लोणावळा लोकल सेवेप्रमाणेच पुणे आणि दौंड दरम्यान लोकल सेवा सुरू करावी. दौंड नगरपरिषदेने दौंड येथे पुणे – सोलापूर लाईनवरबांधण्यात येत असलेल्या नवीन आरयूबीच्या लगतच्यापरिसरात पाणी पुरवठा व ड्रेनेज लाईन जोडणीचे कामडिपोजीट वर्क अंतर्गत करण्याची विनंती केली आहे.
तिसऱ्या मोरीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे त्यासोबत पाणी पुरवठा आणि ड्रेनेज लाइन जोडणीच्या डिपोजीट वर्क कामास परवानगी द्यावी. दौंड – पुणे दरम्यान धावणाऱ्या मेमू लोकलचे दरपूर्वीप्रमाणे 20 रूपये करावेत व पुणे – हैद्राबाद – पुणे(फास्ट), मुंबई – चेन्नई – मुंबई सुपरफास्ट,विशाखापट्टणम सुपर फास्ट आदी लांब पल्ल्यांच्या गाड्यांना दौंड स्थानकात थांबा दयावा. वाढती लोकसंख्या व नागरीकरण लक्षात घेतापुणे – दौंड रेल्वे ट्रॅकचे चौपदरीकरण करावे.
यवतआणि उरुळीच्या मध्ये सहजपुर, उरुळी आणि लोणीच्या मध्ये नायगाव, मांजरी आणि हडपसरच्यामध्येअमनोरा आदी नवीन स्थानकांची निर्मिती करावी, आदी विविध मागण्या आमदार कुल यांनी यावेळी केल्या. दरम्यान या मागण्यांबाबत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाअसून, मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचेआश्वासन त्यांनी दिले असल्याची माहिती यावेळीआमदार राहुल कुल यांनी दिली.
यावेळी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर, आमदार भिमराव तापकीर, आमदार संजय जगताप, माजी आमदार योगेश टिळेकर, बाळा भेगडे, जगदीश मुळीक, माजी नगरसेवक योगेश कटारिया, दौंड पुणे प्रवासी संघाचे विकास देशपांडे, गणेश शिंदे आदी उपस्थित होते.