प्रभात वृत्तसेवा राहू – राहू येथील आठवडे बाजार हा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. या बाजाराला टाकळी, पाणवली,वडगाव बांडे,टेळेवाडी,वाळकी,कोरेगाव भिवर,पाटेठाण, डुबेवाडी, पिलानवाडी,देवकर वाडी,पिंपळगाव इत्यादी गावे जोडलेली आहेत. त्या मुळे या बाजाराचे स्वरूप खूप मोठे आहे. परंतु अलीकडे या बाजारात चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ऊस तोड कामगार,वीटभट्टी कामगार तसेच इतर अनेक प्रकारचे नागरिक या बाजारात येत असतात.परंतु वाढणाऱ्या चोऱ्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या कडे लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा गरीब व मोलमजुरी करणाऱ्या कामगारांना अडचणींना तोंड घ्यावे लागणार आहे.त्या मुळे नागरिकांच्या पोलिस प्रशासनाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. मोबाईल पँटच्या खिशात ठेवणे बंधनकारक… आपण मुख्यतः मेट्रो सिटीमध्ये प्रवास करत असताना मोबाईल हा सुरक्षिततेच्या दृष्टीने पँटच्या खिशात ठेवतो. तशीच परिस्तिथी सध्या राहूच्या बाजारात दिसून येत आहे.जर मोबाईल हा शर्टच्या खिशात ठेवला असेल तर तो राहीलच याची खात्री नाही. “आम्ही पेट्रोलिंग वाढवत आहोत,नागरिकांनी देखील थोड लक्ष ठेवावे. लवकरात लवकर संबंधितांचा छडा लावला जाईल. तसेच असा काही प्रकार आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.” – नारायण देशमुख, पोलीस निरीक्षक, यवत. नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. तसेच एका बाजार आड चोऱ्या होत आहेत.यावर प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. – सुरेश सोनवणे, पोलीस पाटील, राहू “या मध्ये पोलीस प्रशासनाने विशेषतः सायबर विभागाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. कारण काहीही कार्यवाही झाली तरी ही आरोपी लगेच सुटतात.त्या मुळे कडक कार्यवाहीचा संदेश जाणे गरजेचे आहे.” – लक्ष्मण कदम (पाटील),पोलीस पाटील, पिलानवाडी