पुणे – देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणास दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. त्याच्या विरुध्द भारतीय हत्यार कायद्यानूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्निल राजु चव्हाण (25,रा. दांडेकर पुल) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दत्तवाडी पोलीस ठाणेकडील पोलीस कॉन्सटेबल शिवाजी क्षिरसागर व राहुल ओलेकर यांना खबर मिळाली होती की, दांडेकर पुलाजवळील विश्वकर्मा गॅरेजजवळ एक तरुण संशयास्पदरित्या थांबला आहे. त्यानूसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार तपास पथकातील स्टाफसह तेथे गेले. त्यांना तरुणाजवळ हत्यार असल्याचा संशय आल्याने त्यांनी सापळा रचुन त्याला पकडले. त्यावेळी त्याची अंगझडती घेतली असला त्याचे कमरेला देशी बनावटीचे पिस्टल व त्याचे खिश्यात एक जिवंत काडतुस (अंदाजे किंमत 30,000) असे मिळुन आल्याने ते ताब्यात घेतले.
दत्तवाडी पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदया अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही सदरची कारवाई परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड पो.उप-आयुक्त सहायक पोलीस आयुक्त पोमाजी राठोड़, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोउपनिरी स्वप्निल लोहार, पोलीस अंमलदार सुधीर घोटफूले, कुंदन शिदे, महेश गाढवे, अमित सुर्वे, सागर सुतकर, राहुल ओलेकर, शिवाजी क्षिरसागर, शरद राऊत, अक्षयकुमार वाबळे, नवनाथ भोसले, प्रमोद सोसले यांनी केली आहे व दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार सुधीर घोटकुले करत आहेत.