Dasra Melava Shivaji Park : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे…

Updated On:

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा दसरा मेळावा ( Dasara Melava ) शिवाजी पार्क म्हणजे शिवतीर्थावर होत आहे.  जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव, बघिनी आणि मातांनो, असंं म्हणत उध्दव ठाकरे यांनी भाषणाला सुरूवात केली असून विजयादशमीच्या शुभेच्छा देत असताना गेल्या अनेक वर्षाची परंपरा आणि ते दसरा मेळावे माझ्या आजही लक्षात आहेत. पण असा मेळावा फार क्वचित झालेला आहे. अभूतपूर्व! मनापासून सांगतो, मी भारावून गेलो आहे. असं ते म्हटले आहेत.

पुढे त्यांनी “तुम्ही गद्दारच, हा शिक्का पुसता येणार नाही”….असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर घणाघात केला आहे.

उध्दव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे ……..

1. ही कोरडी गर्दी नाही, ही अंत:करणातून आलेली गर्दी आहे – उद्धव ठाकरे

2. ‘डॉक्टरांनी मला वाकण्याची परवानगी दिलेली नाही, पण शिवसैनिकांसमोर मी नतमस्तक होतोय’ – उद्धव ठाकरे

3. ‘यावेळचा रावण वेगळा आहे, आतापर्यंत 10 तोंडांचा रावण होता, आता 50 खोक्यांचा बोकासूर आहे.’ – उद्धव ठाकरे

4. ही शिवसेना एकनिष्ठ शिवसैनिकांची, एका जरी शिवसैनिकाने सांगितलं तरी शिवसेना सोडून जाईन…- उद्धव ठाकरे

5. ‘माझ्या आईवडिलांची शपथ घेऊन सांगतोय, भाजप आणि शिवसेनेचा अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री करायचा असं ठरलं होतं’- उद्धव ठाकरे

6. तुम्ही गद्दारच, हा शिक्का पुसता येणार नाही – उद्धव ठाकरे

7. आजपर्यंत तुम्हाला आनंद दिघे कधी आठवले नाहीत, दिघे एकनिष्ठ होते, आजच कशी दिघेंची आठवण झाली? – उद्धव ठाकरे

8. लोकांचं प्रेम विकत नसतं मिळत, ओरबाडून मिळत नाही. ‘स्वत:चे विचार नाहीत म्हणून बाळासाहेबांचा फोटो वापरतात, इथला एकही माणूस भाड्यानं आणला नाही’ – उद्धव ठाकरे

9. कट करणारे आप्पा म्हणजे कटाप्पा, शिंदे गटावर खोचक टीका. ज्यांच्यावर जबाबदारी दिली ते कटाप्पा. कट करणारे अप्पा म्हणजे कटाप्पा. हे कट करत होते – उद्धव ठाकरे

10. भाजप गाई गाई करतंय, महागाईवर बोलत नाही .आरएसएसच्या दत्तात्रय होसबळे यांचं मी जाहीर अभिनंदन करतो, तुम्ही भाजपला आरसा दाखवलात : उद्धव ठाकरे

11. अमित शाह देशाचे गृहमंत्री की भाजपचे घरगुती मंत्री- उद्धव ठाकरे

12. बाप मंत्री, कारटं खासदार आणि नातू नगरसेवक, अरे त्याला मोठं तर होऊ द्या – उद्धव ठाकरे

13. भाजपने पाठीत वार केला,शिवसैनिकांना पिसाळायला लावू नका,आम्हाला हिंदुत्व शिकवू नका, आमचं हिंदुत्व शेंडी,जानव्यांचं हिंदुत्व नाही – उद्धव ठाकरे

14. उद्या शिंदे सरकारला शंभर दिवस होतील त्यात 90 दिवस दिल्लीवारी; गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा अशी सरकारची अवस्था – उद्धव ठाकरे

15. ‘देशातील सर्व पक्ष संपणार आणि एकच पक्ष राहणार, देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे नेण्याचं काम सुरु’ – उद्धव ठाकरे

16. मला भाजपकडून हिंदुत्व शिकायची गरजच नाही, तुम्ही काय शिकवणार हिंदुत्व? – उद्धव ठाकरे

17. एका व्यासपीठावर भाजपची स्क्रिप्ट न घेता भाषण करुन दाखवा – उद्धव ठाकरे

18. ‘तुम्ही साथ आणि सोबत द्या, मी तुम्हाला पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवेल, बांडगुळं छाटली गेली ती बरंच झालं – उद्धव ठाकरे

19. मोहन भागवतांविषयी आदर, मोहन भागवत महत्वाचे बोलले, स्त्री-पुरुष समानतेवर ते बोलले, ते मुसलमान समाजासोबत संवाद साधत आहेत ही चांगली बाब आहे. – उद्धव ठाकरे

20. देशातील लोकशाही जीवंत राहते की नाही,असा प्रश्न आता उरला आहे, सर्व पक्ष संपवणार म्हटल्यावर देशात हुकूमशाही येत आहे, देशात गुलामगिरी येत आहे, देशप्रेमींनी एकत्र येऊन स्वातंत्र्य अबाधित ठेवावी – उद्धव ठाकरे

आणखी संबंधित बातम्या

waqf board : नव्या सरन्यायाधीशांसमोर होणार वक्फ याचिकांवरील सुनावणी; वाचा महत्त्वाचे मुद्दे!

2025-05-05 17:36:22

waqf board : नव्या सरन्यायाधीशांसमोर होणार वक्फ याचिकांवरील सुनावणी; वाचा महत्त्वाचे मुद्दे!

मनसे निर्धार मेळावा : 'ठाकरे गटासह NCP आणि BJP वर जोरदार टीकास्त्र; जाणून घ्या...राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे..

2023-08-16 16:46:36

मनसे निर्धार मेळावा : 'ठाकरे गटासह NCP आणि BJP वर जोरदार टीकास्त्र; जाणून घ्या...राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे..

शिवसेनाप्रमुखांमुळेच झाली भाजप मोठी

2023-01-20 08:46:10

शिवसेनाप्रमुखांमुळेच झाली भाजप मोठी

Dasra Melava BKC : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे....

2022-10-05 22:19:41

Dasra Melava BKC : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे....

Dasra Melava Shivaji Park Live : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लाईव्ह....

2022-10-05 19:56:42

Dasra Melava Shivaji Park Live : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लाईव्ह....