राहुरी,दि.24 – तालुक्यातील आरडगाव गावात दारूबंदीचा ठराव करूनही मोठ्या प्रमाणात दारू विक्री चालू आहे. दारू अड्ड्यांचा बंदोबस्त होण्यासाठी अनिता जगधने यांनी सर्व महिलांना घेऊन दारू अड्यावर नजरा ठेवून चौकाचौकात महिला उभ्या केल्या. ओढ्यात, काट्यात दारू विकत असल्याचे कळाले. सर्व महिलांनी ओढ्याकडे मोर्चा वळवला. ही माहिती दारुड्यांना कळाल्यावर त्यानी दारूचा बाटल्याचा बॉक्स काट्यातच टाकून पळत सुटले. महिलाही हातात दंडूके घेऊन त्यांच्या मागे पळत असल्याने रणरागिनींचा रौद्रअवतार पाहून दारू धंदेवाल्यांची व दारूड्यांची पळताभुई थोडी झाली.
आरडगाव गावामध्ये अवैध धंदेवाल्यांनी कहर केला. या दारूमुळे अनेक गोरगरीब महिलांचे संसार उद्ध्वस्त होऊन संसाराची राख रांगोळी झाली आहेत. हे सर्व धंदे बंद होण्यासाठी अनिता जगधने यांनी पुढाकार घेतला. सर्व वंचित, कष्टकरी, पीडित महिलांना घेऊन सरपंच सुरेखा म्हसे, ग्रामसेवक यांच्या समोर कथन करून लगेच ग्रामपंचायतीचा दारूबंदी ठराव घेऊन सरपंचासह राहुरी पोलीस स्टेशन गाठले. संबंधित पोलीस अधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. परंतु निवेदन देवूनही पोलीस अधिकारी यांनी कोणतीही कारवाई केली नाही. उलट दारूधंदे चालूच होते. हे पाहून अनिता जगधने या महिलेने पुढाकार घेऊन दारू अड्डे बंद करण्यासाठी सर्व महिलांना घेऊन दारू अड्यावर नजरा ठेवून चौकाचौकात महिला उभ्या केल्या होत्या.
ही माहिती दारूड्यांना कळाली, त्यांनी दारूच्या बाटल्याचा बॉक्स काट्यातच टाकून काट्या काट्याने पळत सुटले. यावेळी महिलाही हातात दंडूके घेऊन त्यांच्या मागे पळत असल्याने रणरागिनींचा रौद्रअवतार पाहून दारू धंदेवाल्यांची व दारूड्यांची पळताभुई थोडी झाली. काही धंदे वाले कड्याकुलपे लावून पळून गेले. दारूचा बॉक्स पकडल्यानंतर महिलांनी पोलीस पाटील जाधव व रविंद्र म्हसे यांना बोलावून पोलिसांना बोलवून घेण्यास सांगितले. तेव्हा चार दिवसांनी पोलीस आले. महिलांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांचीही भंबेरी उडाली.
मीरा थोरात, पुष्पा आव्हाड, शांताबाई जाधव, द्वारकाबाई जाधव, मंगल जगधने, मनिषा जगधने, कुसुम जगधने या महिला यावेळी सहभागी