डोंगरी इमारत दुर्घटना : मृतांचा आकडा 14 वर तर 9 जण जखमी

मुंबई : डोंगरीत केसरबाई इमारत कोसळून मंगळवारी मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांता मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. मंगळवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. सध्या जखमींना जे.जे. रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यात दोन लहान मुलांचाही समावेश आहे. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत बचाव कार्य सुरू होते. अद्यापही ढिगाऱ्याखाली काही जण अडकले असल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

मालाड येथील भिंत कोसळून अनेक जण ठार झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मुंबईतल्या डोंगरी भागात चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला. दरम्यान, ढिगाऱ्याखाली तब्बल 50 जण अडकल्याची भिती व्यक्त करण्यात आली होती. स्थानिकांनी ही इमारत कोसळल्याची माहिती दिली होती. त्यानंतर घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफची टिम आणि रुग्णवाहिका त्वरित दाखल होऊन मदत आणि बचावकार्य सुरू केले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.