दमन – केंद्रशासित प्रदेश दादर व नगरहवेलीतील दमन व दीव या जिल्ह्यांत कोविड-19चा एकही रुग्ण आढळलेला नाही. प्रशासनाने याचे श्रेय कडक लॉकडाऊन, आदेशांचे पूर्ण पालन आणि करोना योद्धांच्या लढाऊवृत्तीला दिले आहे.
केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांनी याविषयी सांगितले की, दमन व दीवमध्ये जवळपास अडीच लाख औद्योगिक कामगार राहतात. ही जागा पर्यटकांचेही आकर्षण केंद्र आहे. मात्र, सध्या लॉकडाऊनमुळे पर्यटनावर बंदी आहे.
भारतात वाढत असलेला करोना ग्रस्तांचा आकडा सव्वा दोन लाखांच्या पार गेला आहे. मात्र भारतभर पाय पसरलेल्या करोनावर काही ठिकाणी मात करण्यात आली आहे. दमन व दीव येथे करोना रुग्ण नसल्याने हे जिल्हे करोनामुक्त घोषित करण्यात आले आहेत.