फणी वादळात जगन्नाथ मंदिराचेही नुकसान
Updated On:

पुरी – नुकत्याच येऊन गेलेल्या फणी चक्रीवादळात येथील विश्वविख्यात जगन्नाथ मंदिराचेही काहीं प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे. तथापी हे नुकसान फार किरकोळ असून मंदिराचा मुख्य ढाचा पुर्ण सुरक्षित राहिला आहे अशी माहिती या मंदिराचे मुख्य प्रशासक पी के मोहपात्रा यांनी सांगितली. या नुकसानीची पहाणी पुरातत्व विभागाचे अधिकारी लवकरच करणार आहेत असेही ते म्हणाले. मंदिराचे जयविजय हे मुख्य द्वार काहीं प्रमाणात या वादळात नुकसानग्रस्त झाले आहे. प्रवेशद्वारावरील जयची मुर्ती भंगली आहे. पुरातत्व विभागाकडून या मंदिराच्या डागडुजीचे काम सध्या सुरू आहे. त्यातच वादळाचा हा फटका तेथे बसल्याने पुढील काळात अधिक योग्य ती काळजी घेण्याचा प्रयत्न केला जात आहे असे त्यांनी नमूद केले.





