हिंगोली: उत्पन्न सोडा, लागवडीचा खर्चही निघेना; सोयाबीन काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग

हिंगोली – जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील साखरा हिवरखेडा, धोतरा, हत्ता पानकनेरगाव, केलसूला खडकी, कापडशिंगि यासह तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांचे सोयाबीन सध्या काढण्यासाठी आले आहे. मात्र गेल्या चार पाच दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून जात आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन कापून टाकले आहे, मात्र पाऊस पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन जमिनीवर त्याला कोंब फुटत आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील खरीप हंगामातील सोयाबीन पीक काढणीस शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली परंतु यंदा अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे पिके पाण्यात गेले आहेत. त्यामुळे उत्पन्न सोडाच लागवडीपासून ते काढणीपर्यंतचा निम्मा खर्चही शेतकऱ्यांच्या पदरात पडत नसल्याचे चित्र आहे.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात अतोनात नुकसान झाले. प्रशासनाच्या वतीने हेक्टरी 13600 रुपये मदत मुख्यमंत्री यांनी जाहीर केली. मात्र हि मदत शेतकऱ्यांना मिळणार कधी व सर्व शेतकऱ्यांना मिळणार का ? नाही हें मात्र अद्यापही कळाले नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीच्या आदी दुष्काळी अनुदान टाकण्यात यावे, किमान त्यामुळे तरी शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल.
यावर्षी हिंगोली जिल्ह्यात सर्वात जास्त सोयाबीनची पेरणी झाली आहे. परंतु यंदा मृग नक्षत्रात पावसाची हजेरी लावून पाऊस जास्त प्रमाणात झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आणि यातच पिकावर लष्करी अळी, शंखी गोगलगायई व यलो मौझ्यक कीड व विविध रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीचा खर्च करावा लागला. त्यानंतर काही दिवसात झालेल्या अति पावसाने तर या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. काही ठिकाणी फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेतील हे पीक क्षणभरात उध्वस्त झाले. सध्या शेतात राहिलेले पीक काढणीला सुरुवात झाली. परंतु उत्पादनात प्रचंड घट येत असून मोठा तोटा सहन करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांकडून बोललेले जात आहे.
एरवी एकर दहा ते बारा क्विंटल दरम्यान उत्पादन होते. मात्र यावर्षी तीन ते चार क्विंटल उत्पादन होत असल्यामुळे निम्मा लागवड खर्चही निघणे कठीण झाले आहे. तर बैल जोड्यांचे प्रमाण दिवसान दिवस कमी झाल्याने आता यंत्रांच्या साह्याचा शेतकरी वापर करत असल्यामुळे मळणी साठा वापरल्या जाणाऱ्या यंत्रालाही लागणाऱ्या इंधन दरवाढीने सहाजिकच मळणीच्या दरातही वाढ झाली आहे.
शेतकऱ्यांची सोयाबीन येताच दरात घसरण –
संपूर्ण खरीप हंगामातील विविध नैसर्गिक आपत्तीचा सामना केल्यानंतर आता उरलेस उरले सोयाबीन काढण्याची शेतकरी लगबग करीत आहेत गतवर्षी सोयाबीनचे दर दहा हजारावर गेले होते त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या क्षेत्रात यंदा वाढ केली होती परंतु सध्या सोयाबीन येताच घरात घसरण सुरू झाली दारात अशी परिस्थिती दिसून येत आहे.





