दैनिक प्रभात करणार ‘नारी सन्मान’ ! समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव सोहळा

Updated On:

पुणे -“यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया:।। असे संस्कृत सुभाषितात म्हटले आहे. साहजिकच हे खरे आहे, जेथे नारीचा सन्मान होतो, त्या स्थानावर, समाजात, कुटुंबात देवाचाही वरदहस्त असतो. ज्या ठिकाणी तसे होत नाही तेथे अशांतता असते. त्यामुळे नारीचा सन्मान कायमच केला पाहिजे. याच भावनेतून 90 वर्षांची देदीप्यमान परंपरा असलेल्या दैनिक “प्रभात’ने “नारी सन्मान’ हा उपक्रम सुरू केला आहे.

करोनाचे मळभ दूर झाल्यामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर हा कार्यक्रम होणार असून, बालगंधर्व रंगमंदिरात दि.10 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता हा सन्मानसोहळा आयोजित करण्यात आला आहे. समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना यादिवशी विशेष कार्यक्रमात गौरवण्यात येणार आहे. दैनिक “प्रभात’ तर्फे आयोजित या कार्यक्रमाला “माणिकचंद ऑक्‍सिरीच’ यांचे मुख्यप्रायोजकत्व लाभले आहे. याशिवाय “महेश नागरी मल्टिस्टेट को ऑप. क्रेडिट सोसायटी लि. पुणे’, “प्रकाश मसाले-मसाला महाराष्ट्राचा’, “वैद्य नानल्स आयुर्वेद’ यांचे सहप्रायोजकत्व या कार्यक्रमाला लाभले आहे. तसेच “डिजिटल प्रभात’ हे “डिजिटल पार्टनर’ म्हणून भूमिका बजावणार आहेत. “नारी सन्मान पुरस्कारा’साठी समाजात विविध स्तरावर कार्य करणाऱ्या महिलांची निवड केली जाते. समाजाप्रती आपले ऋण लक्षात घेऊन ज्या महिला समाजासाठीच उल्लेखनीय कार्य करतात, अशा महिलांचा सन्मान दैनिक “प्रभात’तर्फे यानिमित्ताने केला जातो.

आशा दी व्हर्सेटाइल लिजंड’ची पर्वणी
पुरस्काराच्या मुख्य कार्यक्रमानंतर “ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा सांगितिक प्रवास’ पुण्यातील नामवंत कलाकार सादर करणार आहेत. “आशा दी व्हर्सेटाइल लिजंड’ असे या कार्यक्रमाचे नाव आहे. हा कार्यक्रम पूर्णत: विनामूल्य असून, याचे पासेस दैनिक “प्रभात’च्या कार्यालयात उपलब्ध करण्यात आले आहे. याशिवाय आपले आसन आरक्षित करण्यासाठी संपर्क मोबाइल क्रमांक – 99224-04908.

सन्मानार्थी महिला
श्रीमती मालती दाते, श्रीमती आरती गोखले, श्रीमती भाग्यश्री साळुंखे, श्रीमती अलका गुंजाळ आणि डॉ. पल्लवी साठे-पाटोळे

कार्यक्रम स्थळ आणि वेळ
दि.10 मार्च 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे हा सोहळा होईल.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

2026-10-08 23:30:43

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद !

2026-10-08 22:14:41

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद !

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

2026-10-08 18:32:17

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

2026-10-08 18:11:06

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

2026-10-08 17:15:33

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र