प्रभात वृत्तसेवा बारामती – बारामती नगरपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार पक्षाला ८ जागा बिनविरोध करण्यात यश आले आहे. नगराध्यक्षपदसाठी १४ जण, तर नगरसेवक पदासाठी १४५ जण निवडणुकीच्या मैदानात आहेत, अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी यांनी दिली.शुक्रवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी नगरसेवक पदाच्या ७७ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत. तर नगराध्यक्ष पदाकरिता उमेदवारी दाखल असणाऱ्या दोन सदस्यांनी उमेदवारी मागे घेतली. छाननीच्या दिवशीच प्रभाग क्रमांक २ अ मधून अनुप्रिता तांबे निवडुन आल्या आहेत.अजित पवार गटाच्या वतीने सचिन सातव,शरद पवार गटाच्या वतीने बळवंत बेलदार,भाजपच्या वतीने अॅड.गोविंदराव देवकाते, एकनाथ शिंदे शिवसेना गटाच्या वतीने सुरेंद्र जेवरे तर बहुजन समाज पार्टीच्या वतीने काळुराम चाैधरी निवडणुकीच्या रींगणात नगराध्यक्षपदाच्या रींगणात आहेत.४१ नगरसेवक पदासाठी आज अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी ७७ जणांनी अर्ज माघारी घेतल्याने १४५ उमेदवार नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादीची आठ तोफांची सलामी प्रभाग क्रमांक ५ अ मधून किशोर मासाळ, प्रभाग क्रमांक ६ अ मधून धनश्री बांदल, ६ ब मधून अभिजीत जाधव, प्रभाग क्रमांक ८ अ मधून श्वेता नाळे, प्रभाग क्रमांक १७ ब मधून शर्मिला ढवाण, १८ ब मधून अश्विनी सूरज सातव, प्रभाग क्रमांक २० ब मधून आफ्रिन बागवान हे उमेदवार बिनविरोध झाले आहेत.