‘दादा वस्ताद’ आणि ‘अण्णा’ ! निवृत्ती बांदल यांच्याकडून पै. राक्षे यांचा बुलेट देऊन सन्मान

कोंढवा – पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून हिंद केसरी पै. अभिजित कटके, महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे, उप महाराष्ट्र केसरी पै. महेंद्र गायकवाड यांचा बुलेट व सन्मानचिन्हाने गौरव करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या खांद्याला खांदा उपस्थित असलेले पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य व राष्ट्रवादीचे पुणे शहर उपाध्यक्ष निवृत्ती (आण्णा) बांदल यांनी स्वखर्चातून “महाराष्ट्र केसरी’ शिवराज राक्षे यास बुलेट गाडी देऊन सन्मान केला. “राजकारणातील वस्ताद’ अजित दादांबरोबरीने ज्येष्ठ नेते निवृत्ती बांदल थांबलेले पाहून बांदल यांचे राजकीय विरोधकही आता अण्णांच्या आगामी डावपेचाची चर्चा करू लागले आहेत.
निवृत्ती बांदल म्हणाले की, कुस्ती ही महाराष्ट्राची ओळख व अभिमान असून आपल्या खेळाडूंनी देश-विदेशातील स्पर्धांमध्ये आपल्या शहराचे व राज्याचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी आपण सर्वोतपरी प्रयत्न करणार आहे.
यावेळी पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार दिलीप मोहिते, अशोक पवार, सुनील टिंगरे, चेतन तुपे, जयदेव गायकवाड, जगन्नाथ शेवाळे,कमल ढोले पाटील, कुमार गोसावी, संजय जाधव, अजित घुले, रवींद्र शेवाळे, मोहन होले, उत्तम फुलवरे, नवनाथ बांदल, दिपक बांदल, आशिष बांदल, विजय कामठे, सागर काळभोर, सागर होले, राजेंद्र येप्रे पाटील, बाबासाहेब जाधव, सनी शिरोडे, मयुर रावडे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.





