Sara Arjun : अभिनेत्री सारा अर्जुन (Sara Arjun) सध्या तिच्या ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाच्या प्रचंड यशाचा आनंद साजरा करत आहे. मुख्य अभिनेत्री म्हणून तिचा हा पहिलाच चित्रपट असून, या चित्रपटामुळे ती रातोरात स्टार बनलीह. यापूर्वी बालकलाकार म्हणून ओळख असलेल्या साराने आता लीड रोलमध्ये आपली छाप पाडली आहे. Sara Arjun

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करत आपली यशस्वी घोडदौड सुरूच ठेवली आहे. या यशानंतर सारा विशेष आनंदी असून तिने या यशाचे श्रेय आपल्या वडिलांना, अभिनेते राज अर्जुन यांना दिले आहे. Sara Arjun

साराने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत वडिलांसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. या व्हिडिओमध्ये राज अर्जुन एका कार्यक्रमात आपल्या संघर्षाची काव्यात्मक कहाणी मांडताना दिसतात. त्यांनी 2005 मध्ये साराच्या जन्मानंतर त्यांचे आयुष्य कसे बदलले, याचा उल्लेख केला आहे.

या पोस्टमध्ये सारा लिहिते, “बाबा, मी स्वतःला जितकं पाहिलं त्यापेक्षा जास्त तुम्हाला पाहिलं आहे. तुम्ही मला पडू दिलं, पण पुन्हा उभं राहायला शिकवलं.” ती पुढे म्हणते, “मी जे काही शिकले आहे, ते पुस्तकांमधून नाही, तर तुमच्या शांततेतून शिकले आहे.” Sara Arjun

Sara Arjun : “बाबा, मी स्वतःला जितकं पाहिलं त्यापेक्षा…”; धुरंधरफेम अभिनेत्री झाली भावूक; वडिलांसाठी लिहिली खास पोस्ट

साराने आपल्या यशामागचे खरं कारण वडिलांचा संयम आणि मार्गदर्शन असल्याचे सांगितले. “तुम्ही म्हणता मी तुमचा प्रकाश आहे, पण खरं तर तो प्रकाश तुमचाच आहे. मी तुमची मुलगी नाही, मी तुमच्या कथेचा सर्वात खरा भाग आहे,” अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Sara Arjun)

या पोस्टवर राज अर्जुन यांनीही भावनिक प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिहिले, “काही नात्यांना शब्दांची गरज नसते. तुझ्यासोबत उभ राहण्यात मला समाधान मिळतं. तू माझ्या आत्म्याचा एक भाग आहेस.” (Sara Arjun)

साराच्या या पोस्टवर चाहत्यांकडून भरभरून प्रेम व्यक्त केले जात आहे. कमेंट्समध्ये हार्ट इमोजी आणि कौतुकाचा वर्षाव होत असून, बाप-लेकीच्या या नात्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

हेही वाचा : Motorola Razr 70 Ultra: मोटोरोला रेजर 70 अल्ट्रा येतोय धमाक्यात; 6.9 इंच डिस्प्ले आणि दमदार फीचर्ससह सॅमसंगला टक्कर