बाप रे!!! 20 वर्षीय तरुणीला पेट्रोल पिण्याचे व्यसन; डॉक्टरांनी इशारा देऊनही…

टोरांटो – सर्वसाधारणपणे कोणाला दारुचं व्यसन, सिगारेटचं व्यसन असते. मात्र एका २० वर्षीय तरुणीला चक्क पेट्रोल पिण्याचं विचित्र व्यसन जडलं आहे. पेट्रोल प्यायल्याने माझा मानसिक ताण कमी होतो, असं या तरुणीचं म्हणणं आहे. अशाप्रकारे पेट्रोल प्यायल्याने शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात आणि यामुळे तुझा मृत्यू होईल असे डॉक्टरांनी या तरुणीला सांगितलं आहे. मात्र 20 वर्षीय शेनॉन नावाच्या तरुणीला पेट्रोलचं व्यसन सोडता येत नाही.
कॅनडामधील ओंटारिओ प्रांतात राहणारी शेनॉन रोज सकाळी उठल्यानंतर तिच्या बाथरुममध्ये ठेवलेला लाल रंगाचा पेट्रोलचा प्लास्टीकचा डब्बा तोंडाला लावते. शेनॉनने दिलेल्या माहितीनुसार, तिला पेट्रोलचा वास लहानपणापासूनच आवडायचा. पेट्रोलचा वास घेता यावा म्हणून आईबरोबर कारमध्ये पेट्रोल भरायला गेल्यानंतर ती पेट्रोल भरताना मुद्दाम खाली उतरायची. यामधूनच तिला पेट्रोल पिण्याची सवय लागली. ती दररोज किमान 12 चमचे पेट्रोल पिते
आपल्याला एकटं आणि अपसेट वाटायचं त्यावेळी आपण पेट्रोल प्यायचो आणि यातूनच ही सवय जडली, असं शेनॉन म्हणाली. शेनॉनला पेट्रोलच्या सेवनाचे दुष्परिणाम ठाऊक आहे. तिलाही छातीत दुखणं, ग्लानी येणं यासारखा त्रास या सवयीमुळे होतात. मात्र आपल्याला हे व्यसन सोडवत नसल्याचंही तिने मान्य केलं आहे. “ही सवय धोकादायक असल्याचा मला अंदाज आहे. यामुळे माझा मृत्यू होऊ शकतो हे ही मला ठाऊक आहे. मात्र यानंतरही मला स्वत:ला थांबवता येत नाहीये,” असं शेनॉन म्हणाली.
पुढे ती म्हणाली, “पेट्रोल चवीला गोड आणि थोडं कडवटही लागतं. आंबट सॉसप्रमाणे त्याची चव असते. पेट्रोल गिळताना घशात जळजळ होते. पण पेट्रोल प्यायल्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही. मी सकाळी झोपेतून उठल्यानंतर वॉशरुममध्ये जाऊन पेट्रोल पिते. मी बाहेर जाते तेव्हा छोट्या बाटलीमध्ये थोडं पेट्रोल सोबत घेऊन जाते. मागील वर्षभराहून अधिक काळापासून आपल्याला हे व्यसन लागलं आहे, असं शेनॉनने सांगितलं आहे.
डॉक्टर काय सांगतात?
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलच्या सेवानाने जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. पेट्रोल प्यायल्याने उलट्या होण्याच्या त्रासबरोबर पोटदुखी, गुंगी येणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. दिर्घकालीन परिणामांबद्दल बोलायचं झालं तर, अन्ननलिकेला अंतर्गत दुखापत होणे, हृदयावर परिणाम होणे आणि फुफ्फुसं निकामी होणे यासारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. पेट्रोल शरीरामध्ये गेल्यानंतर विषासारखं काम करतं म्हणून चुकूनही पेट्रोल पिऊ नये, असं डॉक्टर सुचवतात.





