डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: पुनाळेकर यांना 23 जून पर्यंत पोलीस कोठडी
Updated On:
अॅड. संजीव पुनाळेकर यांना 23 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात पुनाळेकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. सीबीआयने त्यांची परत पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी बुधवारी केली होती.
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींना अॅड. पुनाळेकर यांनी शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी सूनवण्यात आली होती. दरम्यान त्यांनी जामीन मिळावा म्हणून अर्ज केला होता. त्यावर सुनावणी सुरू आहे.
टॅग्स:



