नवी दिल्ली: सरकारी सार्वजनिक उपक्रमांमध्ये (PSU) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शासनाने १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणाऱ्या औद्योगिक महागाई भत्त्याच्या (IDA – Industrial Dearness Allowance) नवीन दरांची घोषणा केली आहे. हे नवीन दर बोर्ड स्तरावरील अधिकाऱ्यांपासून ते नॉन-यूनियनाइज्ड सुपरवायझर्सपर्यंत लागू होणार आहेत. प्रमुख ठळक बाबी: लागू होण्याची तारीख: १ ऑक्टोबर २०२५ कोणत्या कर्मचाऱ्यांना लाभ: १९८७, १९९२, १९९७, २००७ आणि २०१७ च्या वेतनश्रेणीवर (Pay Scales) काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी. घोषणा करणारी संस्था: सार्वजनिक उपक्रम विभाग (DPE – Department of Public Enterprises). वेतनश्रेणीनुसार महागाई भत्त्यातील (DA) वाढ: १. १९८७ वेतनश्रेणी (Pay Scale) धारकांसाठी: ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स (AICPI) चा सरासरी निर्देशांक ९६११ राहिला. जुने पद्धतीनुसार, १७८ पॉईंट्सची वाढ झाली आहे. नवीन एकूण IDA: रु. १७८१२/- पर्यंत पोहोचेल. २. १९९२ वेतनश्रेणी (Pay Scale) धारकांसाठी: या वेतनश्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी डीएचे दर मूळ वेतनाच्या आधारावर (Basic Pay) निश्चित करण्यात आले आहेत: मूळ वेतन (मासिक) नवीन डीए दर (%) किमान डीए (रुपयांमध्ये) ₹३५०० पर्यंत ७७४.५०% ₹१७०२४/- ₹३५०० ते ₹६५०० पर्यंत ५८०.९०% ₹२७१०८/- ₹६५०० ते ₹९५०० पर्यंत ४६४.७०% ₹३७७५९/- ₹९५०० च्या वर ३८७.२०% ₹४४१४७/- टीप: डीएच्या रकमेतील ५० पैसे किंवा त्याहून अधिक भाग असल्यास, तो पुढील पूर्ण रुपयामध्ये (Next Rupee) पूर्णांकित (Round Off) केला जाईल. ३. १९९७, २००७ आणि २०१७ वेतनश्रेणी (Pay Scale) धारकांसाठी: या वेतनश्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी नवीन डीए दर पुढीलप्रमाणे आहेत: वेतनश्रेणी (IDA) नवीन डीए दर (%) १९९७ ४६२.७०% २००७ २३३.२०% २०१७ ५१.८०% मंत्रालयांना तातडीचे निर्देश – डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राइजेज (DPE) ने सर्व मंत्रालये आणि विभागांना निर्देश दिले आहेत की, त्यांनी त्यांच्या अखत्यारीतील सर्व केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना (CPSEs) ही माहिती तात्काळ कळवावी. जेणेकरून, नवीन दरांनुसार महागाई भत्त्याचे (DA) भुगतान १ ऑक्टोबर २०२५ पासून करणे शक्य होईल. या आदेशावर सार्वजनिक उपक्रम विभागाच्या (DPE) सचिवांची रीतसर मंजुरी घेण्यात आली आहे.