मुंबई : महाराष्ट्रात जे काही घडत आहे, त्यासाठी माजी सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड जबाबदार असल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी केला होता. मात्र, त्यावर एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी आम्ही कार्यालयाच्या वेळात एकही मिनिट काम करत नाही, हे आम्हाला दाखवून द्या असे आव्हान देताना संजय राऊत यांना खडेबोल सुनावले. मुलाखतकाराने संजय राऊतांनी केलेल्या टीकेचाही उल्लेख केला. त्यावर चंद्रचूड म्हणाले, राजकारणी लोकांची हीच समस्या आहे. त्यांना वाटते की आम्ही त्यांचा अजेंडा पाळला तरच आम्ही स्वतंत्र आहोत, निरपेक्ष आहोत. आम्ही आमच्या बाजूने सातत्याने प्रयत्न करत असतो. आम्ही निवडणूक रोखेंवर निर्णय घेतला, तो कमी महत्वाचा होता का ? अलीगढ मुस्लिम विद्यापीठ प्रकरणात निर्णय घेतला. इतर विषयही आहेतच, माझ्या काळात घटनापीठाने ३८ महत्वाच्या प्रकारानांवर निर्णय घेतले, असे त्यांनी स्पष्ट केले. तो अधिकार फक्त सरन्यायाधीशांकडेच महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतर नाट्यासंदर्भात अनेकदा सुनावणी लांबणीवर पडली आहे, यावेळी मुलाखतकाराने प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी चंद्रचूड म्हणाले की, आम्ही एक मिनिटासाठीही काम केलं नाही हे तुम्ही दाखवून द्या. या वर्षभरात ९ सदस्यीय खंडपीठ, सात सदस्यीय खंडपीठ आदी महत्त्वाच्या घटनात्मक विषयांवर आम्ही निर्णय दिले. त्यामुळे एखादा पक्ष किंवा व्यक्ती ठरवणार का सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या याचिकांवर सुनावणी करावी? हा अधिकार फक्त सरन्यायाधीशांकडे असतो.