टाटा समूहात परतण्यास सायरस मिस्त्रीचा नकार
Updated On:

मुंबई : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहात परतण्यास नकार दिला आहे. अलीकडेच सायरस मिस्त्री यांच्या बाजूने निकाल देणार्या नॅशनल कंपनी लॉ अपील ट्रिब्यूनलने (एनसीएलएटी) त्यांना पुन्हा अध्यक्ष म्हणून नियुक्तीचे आदेश दिले होते. या निर्णयाच्या विरोधात टाटा समूहाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
सायरस मिस्त्री म्हणाले, “एनसीएलएटीच्या निर्णयाचा मी आदर करतो, मी टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष किंवा टीसीएस, टाटा टेलिसर्व्हिसेस आणि टाटा इंडस्ट्रीजचे संचालक म्हणून यांनतर काम करणार नाही. मी हा निर्णय संपूर्ण टाटा समूहाच्या हितासाठी घेतला आहे, जो कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक हितापेक्षा महत्वाचा आहे. ‘





