अखेर ‘मोंथा’ चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले; यंत्रणा अलर्ट मोडवर, महाराष्ट्रावरही होणार परिणाम

Cyclone Montha | आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर ‘मोंथा’ चक्रीवादळ धडकले असून किनारीपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे सुरू आहे. या चक्रीवादळामुळे उत्तर आंध्र प्रदेशात वादळी लाटा उफाळून येणार असल्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाला मोंथा असं नाव देण्यात आलं आहे. थाई भाषेत ‘मोंथा’ म्हणजे सुगंधित फूल, म्हटलं जातं. हे मोंथा चक्रीवादळ मंगळवारी रात्री आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ येऊन धडकलं आहे.
या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश आणि ओडिशा राज्यात अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. ताशी ११० किमी वेगाने वारे वाहत असल्याने सोमवारपासूनच किनारपट्टीवर मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत. खरदारी म्हणून अधिकाऱ्यांनी लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास आणि आपत्कालीन सेवांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.
हवामान विभागानुसार, चक्रवादळ १०० ते ११० किलोमीटरच्या प्रति तास गतीनं वारे वाहत आहे. या स्पीडनं आंध्र प्रदेशमधील काकीनाडाच्या आसपासच्या किनारा पार करत आहे. यामुळे किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि उंच लाटांचा धोका वाढला आहे. मोंथा चक्रीवादळाचा तेलंगणा, तामिळनाडू, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या काही भागात परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. तसेच या राज्यांत पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. Cyclone Montha |
हे वादळ आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथून पुढे जाईल, ज्यामुळे दक्षिण बंगालमधील उत्तर आणि दक्षिण २४ परगणा, पूर्व आणि पश्चिम मेदिनीपूर, झारग्राम, पुरुलिया, पूर्व आणि पश्चिम वर्धमान, बीरभूम आणि मुर्शिदाबाद या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. मोंथा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज आहे.
मोंथा चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रावरही
मोंथा चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रातील काही भागावरही होणार आहे. विदर्भासह मराठवाड्यात काही भागात आज ढगाळ वातावरणासोबतच पाऊस हजेरी लावण्याची दाट शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, कोल्हापूर हे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे. Cyclone Montha |
सात जिल्ह्यांमध्ये वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याची घोषणा
आंध्र प्रदेश सरकारने चक्रीवादळग्रस्त सात जिल्ह्यांमध्ये कृष्णा, एलुरु, पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी, काकीनाडासह काही भागात बुधवारी रात्री ८:३० ते सकाळी ६ वाजेपर्यंत वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. तसेच रात्रीच्या संचारबंदीतून फक्त आपत्कालीन वैद्यकीय सेवांनाच सूट देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना या जिल्ह्यांमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांसह सर्व रस्ते वाहतूक बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. Cyclone Montha |
दरम्यान, बंगालच्या उपसागरातील ‘मोंथा’ चक्रीवादळाला सामोरे जाण्यासाठी आपल्या सरकारने पूर्ण तयारी केली असून ‘रेड अलर्ट’ जारी केलेल्या आठ जिल्ह्यांमध्ये सुमारे दोन हजारांहून अधिक आपत्ती मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत, अशी माहिती ओडिशाचे मुख्यमंत्री मोहनचरण माझी यांनी मंगळवारी दिली. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम विमानतळावरील सर्व ३२ विमाने रद्द करण्यात आली.
हेही वाचा:
phaltan case: फलटणच्या आत्महत्या प्रकरणावर खासदार उदयनराजे यांचा संताप





