#CWC23 #INDvNZ : न्यूझीलंडविरुद्ध विजयाचा दुष्काळ 20 वर्षांनंतर संपला, भारताचा 4 गडी राखून ऐतिहासिक विजय..

World Cup 2023 India vs New Zealand Match Results : विश्वचषक 2023 च्या 21 व्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला. या विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. आता भारताचे 10 गुण झाले आहेत. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 273 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने सहा गडी गमावून लक्ष्य गाठले. मोहमद शम्मी सामन्याचा मानकरी ठरला. या स्पर्धेत पाचव्या विजयासह टीम इंडिया अजूनही अजिंक्य आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडला पहिला पराभव पत्करावा लागला असून हा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघाचा पुढील सामना 29 ऑक्टोबरला इंग्लंडशी होणार आहे.
टीम इंडियाने या विजयासह वनडे वर्ल्ड कपमधील न्यझीलंड विरुद्धचा इतिहास बदलला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड कपमध्ये 20 वर्षांनंतर विजय मिळवला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्ध अखेरचा विजय हा 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये मिळवला होता.
भारताकडून विराट कोहलीने 104 चेंडूत 95 धावांची खेळी केली. विराटने आपल्या खेळीत 2 षटकार अन् 8 चौकार लगावले. रोहित शर्माने 40 चेंडूत 46 आणि रवींद्र जडेजाने 44 चेंडूत 3 चौकार अन् 1 षटकारासह नाबाद 39 धावा केल्या. श्रेयसने 33, राहुलने 27 आणि गिलने 26 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने दोन बळी घेतले. त्याचवेळी बोल्ट-हेन्री आणि सँटनर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
First game of the tournament for him and Mohd. Shami receives the Player of the Match award for his outstanding five-wicket haul in Dharamsala 🏆👏
Scorecard ▶️ https://t.co/Ua4oDBM9rn#TeamIndia | #CWC23 | #MenInBlue | #INDvNZ pic.twitter.com/21kegb4VB0
— BCCI (@BCCI) October 22, 2023
तत्पूर्वी, टाॅस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने डॅरिल मिशेलच्या शतकी आणि रचिन रवींद्रच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारित 50 षटकांत सर्व गडी गमावून 273 धावापर्यंत मजल मारली. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीला आलेल्या किवी संघाची सुरुवात विशेष झाली नाही. डेव्हॉन कॉनवे खातेही न उघडता सिराजचा बळी ठरला. विल यंगही 17 धावा करून शमीच्या गोलंदाजीवर बाद झाला. 19 धावांवर दोन गडी बाद झाल्यानंतर रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल यांनी न्यूझीलंडच्या डावाची धुरा सांभाळली.
पॉवरप्ले संपल्यानंतर किवी संघाची धावसंख्या 34/2 होती. त्यानंतर न्यूझीलंड संघाने धावसंख्या 13 षटकांत 50 आणि 21 षटकांत 100 पार केली. रवींद्रने 56 चेंडूत तर मिशेलने 60 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी मिळून न्यूझीलंडची धावसंख्या 150 धावांच्या पुढे नेली. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 159 धावांची भागीदारी झाली. न्यूझीलंडची तिसरी विकेट 178 धावांवर पडली. रवींद्र 75 धावा करून शमीचा दुसरा बळी ठरला.
मिशेलने लॅथमसह न्यूझीलंडची धावसंख्या 200 धावांच्या पुढे नेली. मात्र, लॅथम पाच धावा करून कुलदीपच्या चेंडूवर बाद झाला, पण मिशेलने स्थिरता दाखवली. त्याने 100 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. दुसऱ्या टोकाला विकेट पडत राहिल्या. कुलदीपने फिलिप्सला 23 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आठ धावा करून चॅपमनही बुमराहचा बळी ठरला.
शमीने न्यूझीलंडच्या डावाच्या 48व्या षटकात सॅन्टनर आणि मॅट हेन्रीला बोल्ड केले. डावाच्या शेवटच्या षटकात त्याने मिशेलला 130 धावांवर बाद केले आणि सामन्यातील पाचवी विकेट घेतली. शेवटी, किवी संघाला 50 षटकात सर्व गडी गमावून 273 धावा करता आल्या. भारताकडून शमीच्या पाच बळींव्यतिरिक्त कुलदीपने दोन आणि बुमराह-सिराजने प्रत्येकी एक बळी घेतला.
शमीच्या नावे दोन विक्रमांची नोंद…
भारताकडून मोहम्मद शमीनं या सामन्यात सर्वाधिक 5 गडी बाद करत दोन विक्रमाची नोंद केली आहे. नवव्या षटकात मोहम्मद शमीला रोहित शर्माने गोलंदाजीसाठी पाचारण केले. शमीने या विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. त्याने किवी सलामीवीर विल यंगला क्लीन बोल्ड केले व भारताला दुसरे यश मिळवून दिले. यंग 27 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. या विकेटसह शमीने एक खास विक्रम आपल्या नावावर केला. विश्वचषकाच्या इतिहासात शमीची ही 32वी विकेट आहे. यासह शमीने अनिल कुंबळेचा वर्ल्डकपमधील मोठा विक्रम मोडीत काढला आहे.
First game of the tournament for him and Mohd. Shami receives the Player of the Match award for his outstanding five-wicket haul in Dharamsala 🏆👏
Scorecard ▶️ https://t.co/Ua4oDBM9rn#TeamIndia | #CWC23 | #MenInBlue | #INDvNZ pic.twitter.com/21kegb4VB0
— BCCI (@BCCI) October 22, 2023
तसेच सामन्यात 5 गडी बाद करताना 50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. शमीने या प्रकरणात अनिल कुंबळेला मागे टाकले. यासह मोहम्मद शमी 50 षटकांच्या विश्वचषकात दोनदा पाच विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. शमीने कपिल देव, व्यंकटेश प्रसाद, आशिष नेहरा रॉबिन सिंग आणि युवराज सिंग यांना एकसाथ मागं टाकले आहे. या सर्व गोलंदाजांनी विश्वचषकात एकदाच पाच विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. (Mohammed Shami breaks Kapil Dev’s record for most five-wicket hauls in World Cup) यापूर्वी 2019 मध्ये झालेल्या विश्वचषकात शमीने इंग्लंडविरुद्ध पाच विकेट घेतल्या होत्या.





