#CWC23 #INDvBAN : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यासाठी Team India पुण्यात दाखल, पहा Video….

पुणे : – विश्वचषक 2023 स्पर्धेत टीम इंडियानं सलग तिसऱ्या विजयाची नोंद करत न्यूझीलंड संघास मागे टाकत गुणतालिकेत अव्वल स्थान काबिज केले आहे. भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले तर या स्पर्धेत चांगली सुरुवात केली आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात पाचवेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला पराभूत करून आपले इरादे स्पष्ट केले होते. यानंतर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला. विश्वचषकाच्या 12व्या सामन्यात शनिवारी(14 आॅक्टोबर) भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला.
त्यानंतर आता एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत येत्या गुरुवारी भारतीय संघाचा सामना बांगलादेशविरूध्द पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (Maharashtra Cricket Association Stadium) गहुंजे येथील स्टेडियमवर होणार आहे. त्यासाठी भारताचा क्रिकेट संघ रविवारी रात्री पुण्यात दाखल झाला आहे. विराट कोहली, रोहित शर्मासह इतर खेळाडूंना पाहण्यासाठी विमानतळावर मोठी गर्दी झाली होती.
Ahmedabad ✅
Touchdown Pune 📍#CWC23 | #TeamIndia | #MeninBlue | #INDvBAN pic.twitter.com/ztXQzhO0y4
— BCCI (@BCCI) October 15, 2023
नियमित कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहलीसह संघातील सर्व खेळाडूंचे सराव सत्र मंगळवारी सकाळी होणार आहे. या स्पर्धेत यजमान भारतीय संघाने आतापर्यंत खेळलेले तीनही सामने जिंकत गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले आहे. त्यातच परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केल्यावर संघाचा आत्मविश्वास दुणावला असून पुण्यात बांगलादेशविरुद्ध होणारा सामाना जिंकत विजयी चौकार फटकावण्यासाठी टीम इंडिया सज्ज बनली आहे.
#WATCH | Maharashtra: ICC World Cup: Team India arrived at Pune for their next match with Bangladesh, earlier today.
India will play against Bangladesh on October 19. https://t.co/NeU9ZLtM54 pic.twitter.com/3ILBk0fnnH
— ANI (@ANI) October 15, 2023
पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्याआधी 1.30 वाजता नाणेफेक होईल. भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण 40 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारताचं वर्चस्व पाहायला मिळालं आहे. टीम इंडियाने 31 सामने जिंकले आहेत, तर 8 बांगलादेशने विजय मिळवला आहे.
दरम्यान, विश्वकरंडक स्पर्धेला अहमदाबादमध्ये नुकतीच थाटात सुरुवात झाली. स्पर्धेच्या 10 ठिकाणांपैकी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे एमसीए इंटरनॅशनल स्टेडियम देखील एक ठिकाण आहे आणि पुण्याचे हे स्टेडियम विश्वचषकासाठी सज्ज आहे. स्टेडियमची आसन क्षमता 37,000 च्या आसपास आहे.
विश्वचषकाच्या काही सराव सामन्यात पावसामुळे बराच व्यत्यय आला होता. पण अशी परिस्थिती टाळण्यासाठी एमसीए पूर्णतः सज्ज आहे. स्टेडियमची ड्रेनेज व्यवस्था अत्यंत उत्तम असून पाऊस थांबल्यानंतर केवळ 30-40 मिनिटात पुन्हा खेळ सुरु होऊ शकतो तसेच मैदान झाकून घेण्यासाठी रोबोटिक व्यवस्था देखील करण्यात आली आहे. आयसीसी हे सर्व तिकिटांचे व्यवस्थापन करत आहे, त्या माहिती नुसार तीन सामन्यांची तिकिटे संपली असून, उर्वरित सामन्यांची तिकिटे देखील संपण्याच्या मार्गावर आहेत. स्टेडीयममध्ये सर्व प्रेक्षकांना मोफत पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे मात्र खाद्यपदार्थ विकत घ्यावे लागतील.
गहुंजे येथील स्टेडियमला जाणे-येणे प्रेक्षकांना सोयीचे जावे, तसेच पार्किंगची कुठलीही समस्या उद्भवू नये म्हणून एमसीएने कंबर कसली आहे. स्टेडियमच्या दीड किलोमीटर परिघात एकूण 42 एकर जागा भाडेतत्वावर घेण्यात आली आहे. त्या ठिकाणी एकूण 7,500 चारचाकी आणि 15,000 दुचाकी वाहनांची पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.





