World Cup 2023 AUS vs AFG Live Score : विश्वचषक २०२३ च्या 39व्या सामन्यात आज ऑस्ट्रेलियाचा सामना अफगाणिस्तानशी होत आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिले काही सामने गमावल्यानंतर अफगाणिस्तानचा संघ जबरदस्त फॉर्मात आहे. त्यांनी गेल्या पाचपैकी चार सामने जिंकले आहेत. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने गमावल्यानंतर सलग पाच सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत उपांत्य फेरी गाठण्याच्या लढाईत दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा होऊ शकते.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अफगाणिस्तानने 50 षटकांत 5 गडी गमावून 291 धावा केल्या. प्रत्युत्तरात 292 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 91 धावांत सात विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर मॅक्सवेलने 76 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. सात विकेट्स गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने शानदार पुनरागमन केले असून सामन्यात रंगत वाढली आहे.
Glenn Maxwell sped to his second century of the #CWC23 while shepherding the Australia chase 👊@mastercardindia Milestones 🏏#AUSvAFG pic.twitter.com/b8PsDgFaYU
— ICC (@ICC) November 7, 2023
AUS vs AFG Live Score : ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 7 बाद 216
38 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या सात गड्यांच्या मोबदल्यात 216 इतकी आहे. ग्लेन मॅक्सवेल 93 चेंडूत 126 आणि पॅट कमिन्स 50 चेंडूत 11 धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 72 चेंडूत 76 तर अफगाण संघाली आणखी तीन विकेट्सची आवश्यकता आहे.
ग्लेन मॅक्सवेलचे झंझावाती शतक
ग्लेन मॅक्सवेलने 76 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार आणि तीन षटकार मारले. त्याच्या या उत्कृष्ट खेळीमुळे ऑस्ट्रेलियन संघ सामन्यात कायम आहे.
292 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खूपच खराब झाली. ऑस्ट्रेलियानं 1.2 षटकात 4 धावसंख्येंवर पहिली विकेट गमावली. ट्रॅव्हिस हेड खाते न उघडताच बाद झाला. नवीन उल हकने त्याला यष्टिरक्षक इक्रम अलीखिलकरवी झेलबाद केले. ऑस्ट्रेलियाने 5.4 षटकात 43 धावसंख्येवर दुसरी विकेट गमावली. मिचेल मार्श 11 चेंडूत 24 धावा करून बाद झाला. नवीन उल हकने त्याला विकेट्ससमोर पायचीत केले. या सामन्यातील नवीन उल हकचे ही दुसरी विकेट ठरली. ऑस्ट्रेलियाने 87 धावांवर सहावी विकेट गमावली. रशीद खानने मार्कस स्टॉइनिसला विकेट्ससमोर पायचीत केले. स्टॉइनिसने सात चेंडूंत सहा धावा केल्या. त्याआधी ऑस्ट्रेलियाला 69 धावांवर पाचवा धक्का बसल. मार्नस लॅबुशेन 28 चेंडूत 14 धावा करून बाद झाला. रहमत शाहच्या अचूक थ्रोने तो धावबाद झाला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. रहमानउल्ला गुरबाज 25 चेंडूत 21 धावा करून बाद झाला. यानंतर रहमत शाह आणि इब्राहिम झद्रान यांनी दुसऱ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी केली. रहमत 30 धावा करून मॅक्सवेलच्या चेंडूवर बाद झाला. यानंतर इब्राहिमने कर्णधार हशमतुल्ला शाहिदीसोबत तिसऱ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. शाहिदी 26 धावा करून बाद झाला.
अजमतुल्ला उमरझाईही 22 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मोहम्मद नबी 12 धावा करू शकला. दरम्यान, इब्राहिमने वनडे कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले. विश्वचषकात अफगाणिस्तानसाठी शतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला.
इब्राहिमने 143 चेंडूंत आठ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 129 धावांची खेळी केली. त्याचवेळी राशिदने 18 चेंडूत 35 धावांच्या खेळीत दोन चौकार आणि तीन षटकार ठोकले. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने दोन बळी घेतले. तर मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल आणि अॅडम झाम्पा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.