World Cup 2023 AUS vs AFG Match : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने मंगळवारी अफगाणिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. एकदिवसीय सामन्यांत धावांचा पाठलाग करताना द्विशतक फटकावणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. मात्र, या खेळीदरम्यान त्याला झालेल्या दुखापतीमुळे आता ऑस्ट्रेलिया संघाच्या चिंतेत भर पडली आहे.
पायात क्रॅम्प येत असतानाही मॅक्सवेलने फुटवर्कचा वापर न करता दमदार नाबाद द्विशतकी खेळी केली. त्याच्या कामगिरीमुळेच ऑस्ट्रेलियाचा संघ उपांत्य फेरीत दाखल झाला. मात्र, गोल्फ कार्टवर झालेल्या दुखापतीनंतर तो या स्पर्धेसाठी संघात परतला होता. त्याने जी खेळी खेळली त्याचा विक्रम ठरला.
मात्र, आता येत्या शनिवारी बांगलादेश विरुद्धच्या लढतीत तो खोळू शकेल किंवा नाही याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यातच आगामी उपांत्य फेरीचा सामना महत्त्वाचा असल्याने बांगलादेश विरुद्ध त्याला खेळवण्याचा धोका ऑस्ट्रेलिया पत्करणार नाही.
#CWC23 #AUSvAFG | ग्लेन मॅक्सवेलचं तूफानी द्विशतक; आफगाणिस्तानच्या जबड्यातून हिसकावला विजय!
यंदाच्या स्पर्धेच्या सुरुवातीपासून अनेक सामन्यांत तो खेळू शकलेला नव्हता. मात्र, त्याने अफगाणिस्तान विरुद्ध जी खेळी साकार केली त्याचे कौतुक आता सगळेच करत आहेत. मात्र, तो वैद्यकीय अहवालात मॅचफिट ठरला तरीही त्याला अखेरच्या साखळी लढतीत खेळवले जाणार नसल्याचे संकेत ऑस्ट्रेलियाच्या संघ व्यवस्थापनाने दिले आहेत.