\n

पाठीला झालेली दुखापत, पायांचे दुखावलेले स्नायु या सगळ्या व्याधींवर मात करत ग्लेन मॅक्‍सवेलने नाबाद द्विशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी अफगाणिस्तानवर 3 गडी राखून अविश्‍वसनिय विजय मिळवून दिला. एकवेळ 7 बाद 91 अशी बिकट स्थिती असताना मॅक्‍सवेलने कर्णधार पॅट कमिन्सच्या साथीत आठव्या गड्यासाठी तब्बल 202 धावांची अखंडीत भागीदारी केली. त्यात कमिन्सचा वाटा अवघ्या 12 धावांचा होता यावरून मॅक्‍सवेलच्या तडाखेबंद फलंदाजीचा चलचित्रपट समोर उभा राहतो. या विजयाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत थाटात प्रवेश केला.

\n

अफगाणिस्तानने विजयासाठी दिलेल्या 292 धावांचा पाठलाग करताना बलाढ्य ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची चांगलीच वाताहत झाली. सलामीवीर ट्रेव्हीस हेड खाते उघडण्यापूर्वीच परतला. पाठोपाठ 11 चेंडूत 2 चौकार व 2 षटकार फटकावणारा मिशेल मार्शही बाद झाला. भरात असलेल्या डेव्हीड वॉर्नरनेही साफ निराशा केली. त्याच्या पुढच्याच चेंडूवर जोस इंग्लिस तंबूत परतला. तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी प्रख्यात असलेला मार्नस लेबुशेन अनावश्‍यक धाव घेताना धावबाद झाला. यावेळी ऑस्ट्रेलियाची स्थिती 5 बाद 69 अशी बिकट बनली होती. मार्कस स्टोनिसनेही ग्लेन मॅक्‍सवेलच्या साथीत डाव सावरण्याचा केलेला प्रयत्न फोल ठरला व तो देखील अवघ्या 6 धावांवर बाद झाला.

\n

पाठोपाठ मिशेल स्टार्कही परतला. मात्र एका बाजूने भक्कम फलंदाजी करत असलेल्या मॅक्‍सवेलने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने चौकार व षटकारांची आतषबाजी करत स्पर्धेतील आपले दुसरे शतकही साकार केले. हातातून गेलेला सामना मॅक्‍सवेलमुळे आवाक्‍यात आला. यावेळी कर्णधार पॅट कमिन्सने मॅक्‍सवेलला भक्कम साथ दिली. मॅक्‍सवेलने मिळालेल्या जीवदानांचा लाभ घेत तडाखेबंद द्विशतक फटकावले. त्याने आपल्या नाबाद 201 धावांच्या खेळीत 128 चेंडूत 21 चौकार व 10 षटकारांची आतषबाजी केली. कमिन्स 12 धावांवर नाबाद राहीला. अफगाणिस्तानकडून रशीद खान, नवीन उल हक व अजमतुल्लाह ओमरझाई यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

\n

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. रहमानउल्ला गुरबाज 25 चेंडूत 21 धावा करून बाद झाला. यानंतर रहमत शाह आणि इब्राहिम झद्रान यांनी दुसऱ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी केली. रहमत 30 धावा करून मॅक्सवेलच्या चेंडूवर बाद झाला. यानंतर इब्राहिमने कर्णधार हशमतुल्ला शाहिदीसोबत तिसऱ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. शाहिदी 26 धावा करून बाद झाला.

\n

अजमतुल्ला उमरझाईही 22 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मोहम्मद नबी 12 धावा करू शकला. दरम्यान, इब्राहिमने वनडे कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले. विश्वचषकात अफगाणिस्तानसाठी शतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला.

\n

इब्राहिमने 143 चेंडूंत आठ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 129 धावांची खेळी केली. त्याचवेळी राशिदने 18 चेंडूत 35 धावांच्या खेळीत दोन चौकार आणि तीन षटकार ठोकले. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने दोन बळी घेतले. तर मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल आणि अॅडम झाम्पा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"#CWC23 #AUSvAFG | ग्लेन मॅक्सवेलचं तूफानी द्विशतक; आफगाणिस्तानच्या जबड्यातून हिसकावला विजय!","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/11/max.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc23-ausvafg-australia-reached-semi-finals-on-the-strength-of-maxwell-alone-afghanistan-lost-by-three-wickets#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/11/max.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc23-ausvafg-australia-reached-semi-finals-on-the-strength-of-maxwell-alone-afghanistan-lost-by-three-wickets#webpage","name":"#CWC23 #AUSvAFG | ग्लेन मॅक्सवेलचं तूफानी द्विशतक; आफगाणिस्तानच्या जबड्यातून हिसकावला विजय!","url":"https://www.dainikprabhat.com/cwc23-ausvafg-australia-reached-semi-finals-on-the-strength-of-maxwell-alone-afghanistan-lost-by-three-wickets","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc23-ausvafg-australia-reached-semi-finals-on-the-strength-of-maxwell-alone-afghanistan-lost-by-three-wickets#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/11/max.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc23-ausvafg-australia-reached-semi-finals-on-the-strength-of-maxwell-alone-afghanistan-lost-by-three-wickets#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/cwc23-ausvafg-australia-reached-semi-finals-on-the-strength-of-maxwell-alone-afghanistan-lost-by-three-wickets","name":"#CWC23 #AUSvAFG | ग्लेन मॅक्सवेलचं तूफानी द्विशतक; आफगाणिस्तानच्या जबड्यातून हिसकावला विजय!"}}]}}}

#CWC23 #AUSvAFG | ग्लेन मॅक्सवेलचं तूफानी द्विशतक; आफगाणिस्तानच्या जबड्यातून हिसकावला विजय!