World Cup 2023 Final India vs Australia : सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला विचारले गेले होते की, अहमदाबादच्या मैदानावर तब्बल सव्वा लाख भारतीय पाठीराख्यांचा जल्लोष असेल व त्यामुळे तुमच्यावर दडपण येणार का? यावर कमिन्स म्हणाला की, आम्ही पहिल्या 10 षटकात गोलंदाजी इतकी अचुक करु की, प्रेक्षक शांत होतील व दडपण भारतीय संघावरच राहील. तो या पत्रकार परिषदेत जे बोलला ते त्याने करुनही दाखवले. त्याने विराट कोहली व श्रेयस अय्यर यांना बाद केले व संपूर्ण स्टेडियमवर शांतता पसरली. दरम्यान, संपूर्ण स्पर्धेत स्फोटक फलंदाजी करणारा भारतीय संघ अंतिम फेरीत अपयशी ठरला . अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने आक्रमक सुरुवात केली होती. मात्र, मधल्या षटकांमध्ये भारतीय डाव रुळावरून घसरला. याचे परिणाम टीम इंडियाला भोगावे लागले आहेत. या सामन्यात भारतीय फलंदाजांना एकूण 13 चौकार आणि तीन षटकार मारता आले. भारताने 76 धावांत दोन विकेट गमावल्या होत्या. यास्थितीत श्रेयस अय्यर आणि विराट कोहली या दोन नवीन फलंदाजांचे काम डाव सांभाळणे आणि स्ट्राईक रोटेट करणे हे होते, परंतु कमिन्सने श्रेयसला लेन्थ बॉलवर यष्टिरक्षकाकडून झेलबाद केले. गेल्या दोन सामन्यात शतके झळकावणारा श्रेयस चार धावा करून स्वस्तात बाद झाला. #CWC2023 #INDvAUS Final : टीम इंडियाला ‘या’ चुका पडल्या महागात; जाणून घ्या…Final मध्ये भारतीय फलंदाज नेमकं कुठं चुकले… यानंतर विराटने केएल राहुलसोबत चौथ्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली. असे वाटत होते की हे दोन्ही फलंदाज स्थिरावू लागले आहेत आणि आता धावगती वाढवतील. त्यानंतर कमिन्सने विराटला बोल्ड केले. तो 63 चेंडूंत चार चौकारांच्या मदतीने 54 धावा करून बाद झाला. त्यानंतर संपूर्ण स्टेडियमवर शांतता पसरली होती. #CWC2023 #INDvAUS Final : हेडची शतकी खेळी; टीम इंडियाचं स्वप्न भंग, ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा ‘वर्ल्ड चॅम्पियन’ दरम्यान, विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (19 नोव्हेंबर) झालेल्या विजेतेपदाचा सामना सहा गडी राखून जिंकून त्याने विजेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता ठरला आहे. त्याचवेळी भारताचे तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. ट्रेव्हिस हेड हा ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा खरा हिरो ठरला.