Mumbai News : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने 4 ते 11 फेब्रुवारी 2026 या कालावधीत कारवाई करत कोट्यवधींचा अमली पदार्थ जप्त केले आहे. याप्रकरणी, 8 जणांना अटकही करण्यात आली आहे. मुंबई कस्टम झोन – 3 (एअरपोर्ट) यांनी या कारवाईत हिरे, सोने आणि परकीय चलन जप्त केले आहे. कस्टम्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, कारवाई जवळपास 16.7 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ, 38 लाख रुपयांचे हिरे, 15 लाख रुपयांचे सोने आणि विविध प्रकरणात 1.13 कोटी रुपयांचे परकीय चलन असा मोठा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यात सुमारे १६.७५६ किलो संशयित एनडीपीएस (हायड्रोपोनिक वीड) जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत १६.७५६ कोटी रुपये इतकी आहे. तसेच २४६.७५ कॅरेट नैसर्गिक व लॅब-ग्रोउन हिरे जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत सुमारे ₹३८.२८ लाख आहे. याशिवाय १०४ ग्रॅम २४ कॅरेट सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत अंदाजे ₹१५.२४ लाख आहे. विविध प्रकरणांत मिळून ₹१.१३ कोटींचे परकीय चलन देखील जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, कस्टम्स विभागाकडून विमानतळावर तस्करीविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात आली असून संबंधित प्रवाशांविरुद्ध एनडीपीएस व कस्टम्स कायद्यांतर्गत पुढील तपास सुरू आहे.