Gold and Silver : धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
Gold and Silver : मेहता ज्वेलर्समध्ये खरेदीसाठी उत्साह

तळेगाव दाभाडे – गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात झालेली घसरण ग्राहकांसाठी खरेदीची संधी ठरली आहे. धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर शहरातील मेहता ज्वेलर्समध्ये सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. बाजारभावातील घसरणीचा लाभ घेत अनेक ग्राहकांनी खरेदीला प्राधान्य दिले.
सोने आणि चांदी हे केवळ मौल्यवान धातू नसून भारतीय संस्कृतीत समृद्धी, सुरक्षितता आणि भावनिक नात्यांचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे सणासुदीच्या काळात या धातूंच्या खरेदीला विशेष महत्त्व असते.
यंदाही धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ग्राहकांनी मोठ्या उत्साहात सोने-चांदीची खरेदी केली. ग्राहकांनी दाखवलेला विश्वास आणि दिलेला प्रतिसाद आनंददायी असल्याचे मेहता ज्वेलर्सचे श्रवण सुरेंद्र मेहता यांनी सांगितले.
तळेगाव दाभाडे शहरात मेहता ज्वेलर्सने अनेक वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. उत्तम गुणवत्ता, पारदर्शक व्यवहार आणि ग्राहकांचे समाधान ही व्यवसायाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. ग्राहकांचे प्रेम आणि विश्वास हीच आमची खरी संपत्ती आहे.
ही परंपरा यापुढेही कायम राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे मेहता यांनी स्पष्ट केले. धनत्रयोदशीप्रमाणेच लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावरही ग्राहकांनी सोने-चांदी खरेदीसाठी पुढाकार घ्यावा.
सध्याच्या बाजारभावातील घसरणीमुळे खरेदीची संधी उपलब्ध झाली असून ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. मेहता ज्वेलर्सच्या वतीने सर्व ग्राहकांना दीपावलीच्या शुभेच्छाही देण्यात आल्या.
‘ग्राहकांचा विश्वास हीच आमची परंपरा आहे. धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर मेहता ज्वेलर्सला भेट देऊन सोने-चांदीच्या खरेदीसाठी आमच्यावर विश्वास दाखवणाऱ्या सर्व ग्राहकांचे आभार. लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने खरेदीसाठी येणाऱ्या सर्व ग्राहकांचेही स्वागत आहे.’ – श्रवण सुरेंद्र मेहता, प्रोप्रायटर, मेहता ज्वेलर्स
Pimpri-Chinchwad: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी जाहीर





