Wai: ग्राहकांचा विश्वास हीच वाई अर्बन बँकेची खरी ताकद – अनिल देव
Wai पाचवड ही व्यापारीदृष्टया महत्त्वाची बाजारपेठ असून, या परिसरातील व्यावसायिक, शेतकरी आणि उद्योजकांना बँकेच्या माध्यमातून अधिक चांगल्या आर्थिक सुविधा उपलब्ध द्याव्यात, अशी सूचना बाळासाहेब वाघ यांनी केली. ग्राहकांशी थेट संवाद साधणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि विश्वासार्ह बँकिंग सेवा देणे, हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश असल्याचे सरव्यवस्थापक संतोष बागुल यांनी सांगितले.

Wai: वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या 105 वर्षांच्या सहकार परंपरेचा गौरव करताना ग्राहकांना दर्जेदार सेवा देणे, ठेवीदारांचा विश्वास जपणे आणि कर्जवाटपाबरोबरच नियमित कर्ज वसुलीला प्राधान्य दिले आहे. ग्राहकांचा विश्वास हीच वाई अर्बन बँकेची खरी ताकद आहे असे मत बँकेचे अध्यक्ष अनिल देव यांनी व्यक्त केले.
पाचवड, (ता. वाई) येथे आयोजित बँकेच्या ग्राहक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुधाकर गायकवाड, प्रगतशील शेतकरी प्रभाकर भोसले, व्यावसायिक बाळासाहेब वाघ, उद्योजक सुमेध भट, व्यापारी साहेबराव शेलार, अंकुश शिंदे, डॉ. संजीव गोखले, हेमंत पवार, सचिन सूर्यवंशी, मोहन भोसले या मान्यवरांसह ग्राहक उपस्थित होते.
अनिल देव म्हणाले, बँकेच्या 27 शाखांच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा दिली जात असून, पाचवड शाखेची कामगिरी समाधानकारक असून शाखा दरवर्षी नफ्यात आहे. या शाखेमुळे पाचवड परिसरातील व्यापारी, शेतकरी, उद्योजक आणि सर्वसामान्य ग्राहकांसाठी बँकेच्या स्थानिक शाखेमुळे आर्थिक व्यवहार अधिक सुलभ झाले आहेत. बँकेच्या पुढील पाच वर्षांत दोन हजार कोटी रुपयांचा व्यवसाय उभारण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बँकेचे ग्राहक, ठेवीदार, कर्जदार आणि हितचिंतक यांनी सहकार्य करावे, असे आवाहन देव यांनी केले.
पाचवड ही व्यापारीदृष्टया महत्त्वाची बाजारपेठ असून, या परिसरातील व्यावसायिक, शेतकरी आणि उद्योजकांना बँकेच्या माध्यमातून अधिक चांगल्या आर्थिक सुविधा उपलब्ध द्याव्यात, अशी सूचना बाळासाहेब वाघ यांनी केली. ग्राहकांशी थेट संवाद साधणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि विश्वासार्ह बँकिंग सेवा देणे, हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश असल्याचे सरव्यवस्थापक संतोष बागुल यांनी सांगितले.
बँक व्यवस्थापन मंडळाचे सदस्य अविनाश जोशी, संचालक प्रीतम भुतकर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी वाई पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर भोसले, दैनंदिन ठेव प्रतिनिधी विलास साळुंखे, अविनाश निकम, नंदकुमार तांबोळी यांचा गौरव करण्यात आला.
बँकेचे संचालक रमेश ओसवाल, काशीनाथ शेलार, मकरंद मुळये, अशोक लोखंडे, चंद्रकांत गुजर, संचालिका सौ. ज्योती गांधी, सहा. सरव्यवस्थापक विजय बनकर यांनी स्वागत केले. श्रीराम पंडीत यांनी शाखेची माहिती दिली. मल्हारी पेटकर यांनी यांनी सूत्रसंचालन केले. उपसरव्यवस्थापक सुहास पानसे यांनी आभार मानले.





