#IPL2023 #CSKvLSG : लखनौने टाॅस जिंकला, कर्णधार राहुलने घेतला ‘हा’ निर्णय…

चेन्नई :- आयपीएलच्या सहाव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी होणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. चेन्नईचा संघ 2019 नंतर प्रथमच त्यांच्या घरच्या मैदानावर उतरणार आहे.
चेन्नई वि. लखनौ या सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार असून तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा लखनौ सुपर जायंट्सच्या बाजूनं लागला आहे. (Lucknow Super Giants won the toss and elected to field) लखनौ सुपर जायंट्सने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला असून चेन्नईच्या संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
🚨 Toss Update🚨@LucknowIPL win the toss and elect to field first against @ChennaiIPL .
Follow the match ▶️ https://t.co/buNrPs0BHn#TATAIPL | #CSKvLSG pic.twitter.com/sT9UZLHwH6
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2023
दरम्यान, चालू मोसमात चेन्नईला पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. तर दुसरकीकडे लखनौने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आहे.





