CSK vs SRH : आयपीएल २०२६ स्पर्धेतील ६३ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सचा चेपॉक स्टेडियमवर ५ विकेट्सने पराभव (CSK vs SRH) केला. या विजयामुळे हैदराबादला केवळ मोठा दिलासाच मिळाला नाही तर गुजरात टायटन्सनेही प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित केले. या सामन्याच्या निकालानंतर हैदराबादला टॉप-२ मध्ये स्थान मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे. सामन्यात काय घडले? चेन्नई सुपर किंग्सने निर्धारित २० ओव्हरमध्ये ७ विकेट्स गमावून १८० धावा केल्या. हैदराबादसमोर विजयासाठी (CSK vs SRH) १८१ धावांचे आव्हान होते. हैदराबादची सुरुवात संथ झाली, मात्र तिसऱ्या क्रमांकावर उतरलेल्या इशान किशनने आक्रमक फलंदाजी करत सामन्याची सूत्रे हातात घेतली. त्यानंतर हेनरिक क्लासेनने देखील विस्फोटक फलंदाजी करत हैदराबादची मॅच जिंकण्याची आशा मजबूत केली. संजू सॅमसन विरुद्ध हेनरिक क्लासेन 14.3 ओव्हरमध्ये नूरने मिस्ट्री बॉल टाकला अन् क्लासेन या बॉलवर फसला. क्लासेन खेळण्यासाठी थोडं पुढं आला अन् संजूने मागे आपल्या ग्लब्जने बेल्स उडवल्या. 0.08 सेकंदात संजूने स्टंप उडवला अन् घातक ठरणाऱ्या क्लासेनला माघारी पाठवलं. Another day, another opponent, same speed 🙌 That was lightening fast ✨ stumping by Sanju Samson there to dismiss the dangerous Heinrich Klaasen 🔥🥵 If you blink it, you miss it 🤌 Absolute masterclass by our very own Chetta 🫶😍 #CSKvsSRH pic.twitter.com/rz3EZZpaSV https://t.co/yciZ6I5nzG — Aware Indian (@Aware_Indian7) May 18, 2026 स्टंप उडल्यावर संजूने जंगी सेलीब्रेशन केलं. मात्र क्लासेनला हे आवडलं नाही. संजूकडे पाहून क्लासेन थुंकला, असं काहींनी म्हटलं आहे. त्यावर संजू भडकला अन् क्लासेनला जाता जाता काहीतरी बोलला. त्यामुळे क्लासेन आणि संजू दोघं एकमेकांच्या अंगावर गेले. CSK vs SRH विकेट मिळालेल्या नूर अहमद याने संजूचा राग पाहून त्याला धरून ठेवलं तर दुसरीकडे चेन्नईचा पैलवान शिवम दुबे याने क्लासेनची समजूत घातली अन् त्याला पॅव्हेलियनमध्ये धाडलं. त्यामुळे वाद मिटला. संजूचा राग तरी देखील शांत झाल्याचं दिसलं नाही. Heated argument between sanju and klaseen #cskvssrh#sanjusamson#HeinrichKlaasen pic.twitter.com/A2noDYjGk9 — NOTHING (@Nothing_il9zO) May 18, 2026 संजूची आक्रमक विकेटकीपिंग (CSK vs SRH) त्यानंतर देखील पहायला मिळाली. पण संजूची स्मार्ट विकेटकिपिंग पाहून धोनीने ड्रेसिंग रुममध्ये सुटकेचा श्वास घेतल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यातील संजू-क्लासेन वाद आयपीएलमधील यंदाच्या हंगामातील सर्वात चर्चित घटनांपैकी एक ठरला आहे.