CSK Team Fined For Slow Over Rate IPL 2026 : गुजरात टायटन्सविरुद्धच्या मानहानिकारक पराभवासोबतच चेन्नई सुपर किंग्सचे आयपीएल २०२६ (IPL2026 )मधील आव्हान संपुष्टात आले आहे. ८९ धावांच्या या मोठ्या पराभवाच्या धक्क्यातून चेन्नईचा संघ सावरत नाही तोच, बीसीसीआयने त्यांना आणखी एक मोठा दणका दिला आहे. गुजरातविरुद्धच्या सामन्यात संथ गतीने षटके टाकल्याप्रप्रकरणी बीसीसीआयने चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडसह संपूर्ण संघावर मोठी कारवाई केली आहे. ऋतुराजला २४ लाखांचा फटका; खेळाडूंचीही मॅच फी कापली! (CSK Team Fined) चेन्नई सुपर किंग्सकडून या चालू हंगामात ‘स्लो ओव्हर रेट’ची ही दुसरी चूक झाली आहे. यापूर्वी हंगामातील १८ व्या सामन्यातही चेन्नईने निर्धारित वेळेत षटके पूर्ण केली नव्हती. आयपीएलच्या आचारसंहितेनुसार दुसऱ्यांदा ही चूक झाल्यामुळे किमान ओव्हर रेटच्या नियम २.२२ अंतर्गत कर्णधार ऋतुराज गायकवाडवर २४ लाख रुपयांचा भारी दंड ठोठावण्यात आला आहे. केवळ कर्णधारच नाही, तर या सामन्यात खेळणाऱ्या ‘इम्पॅक्ट प्लेअर’सह संघातील इतर सर्व खेळाडूंना प्रत्येकी ६ लाख रपये किंवा त्यांच्या मॅच फीच्या २५ टक्के (यातील जी रक्कम कमी असेल ती) दंड ठोठावला आहे. Chennai Super Kings captain Ruturaj Gaikwad has been fined ₹24 lakh after CSK maintained a slow over-rate during their IPL 2026 clash against Gujarat Titans in Ahmedabad. The penalty comes as CSK’s second over-rate offence of the season, leading to stricter sanctions under IPL… pic.twitter.com/1Hh8gS32mk — IndiaToday (@IndiaToday) May 22, 2026 इतिहासातील सर्वात मोठा पराभव अन् धोनीची उणीव! (CSK Team Fined) गुजरात टायटन्सने दिलेल्या २३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा डाव अवघ्या १४० धावांवर आटोपला. ८९ धावांचा हा पराभव धावांच्या बाबतीत चेन्नई सुपर किंग्सच्या आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा आणि लाजिरवाणा पराभव ठरला आहे. चेन्नईला या पूर्ण हंगामात त्यांचा दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनीची उणीव सर्वात जास्त भासली, जो दुखापतीमुळे या मोसमात एकही सामना खेळू शकला नाही. हेही वाचा – GT vs CSK : गिल-सुदर्शनच्या वादळानंतर रबाडा-सिराजचा कहर! गुजरातकडून चेन्नईचा दारुण पराभव सलग तिसऱ्यांदा प्ले-ऑफमधून बाहेर; ऋतुराजची कप्तानी अपयशी (CSK Team Fined) ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ससाठी हा हंगाम अत्यंत निराशाजनक ठरला. संघाने खेळलेल्या १४ सामन्यांपैकी अवघे ६ सामने जिंकले, तर ८ सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. १२ गुण आणि -०.३४५ च्या अत्यंत खराब नेट रनरेटमुळे चेन्नईचे प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न भंगले. आयपीएलच्या इतिहासात सलग तिसऱ्यांदा चेन्नईचा संघ प्ले-ऑफ गाठण्यात अपयशी ठरला आहे. चेन्नईने आपले शेवटचे आयपीएल जेतेपद २०२३ मध्ये एमएस धोनीच्या कप्तानीखाली जिंकले होते.