CRPF Vehicle Accident : जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) (CRPF Vehicle Accident) एक वाहन नदीत कोसळले. त्या अपघातात सीआरपीएफचे ९ जवान जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले. जखमी जवानांच्या प्रकृतीला धोका नसल्याचे समजते. संबंधित अपघात श्रीनगर शहराच्या हद्दीलगत घडला. सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर वाहन उलटून रस्त्यालगतच्या नदीत कोसळले. अपघाताची माहिती मिळताच तातडीने बचाव कार्य हाती घेण्यात आले. वाहन कोसळलेल्या ठिकाणी पाण्याची पातळी कमी असल्याने जवानांपर्यंत पोहचण्यात बचाव पथकांना फार वेळ लागला नाही. सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रूग्णालयाला भेट देऊन जखमी जवानांची विचारपूस केली.