नवी दिल्ली – जम्मूत तैनात असलेल्या सीआरपीएफ सुरक्षा दलातील एका जवानाला करोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे आता सुरक्षा दलातही याची लागण सुरू झाल्याचे दिसून आले आहे. हा जवान नर्सिंग असिस्टंट म्हणून काम करीत होता.
त्याला सध्या दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा जवान सध्या सुट्टीवर होता. त्याची रजा 7 एप्रिलला संपत होती. ती संपून तो पुन्हा सेवेत रूजू होण्यापुर्वी त्याने करोनाची टेस्ट करून घ्यावी, अशी सूचना त्याला करण्यात आली होती. त्याला मंगळावरी करोना असल्याचे स्पष्ट झाले.
या महिन्याच्या सुरुवातीला निमलष्करी दलातील एका डॉक्टरलाही करोना झाल्याचे आढळून आले होते. सीआरपीएफ ही सव्वा तीन लाख जवान असलेली एक मोठी निमलष्करी संघटना असून या संघटनेकडे देशांतर्गत सुरक्षेचा मोठा भार आहे.