भीमा कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी

120 किलोचा बोकड, 2 फुटी गाय, पावणेतीन फुटाचे घोडे प्रदर्शनाचे आकर्षण

कोल्हापूर : शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व एकाच छताखाली सर्व खरेदी-विक्री करता यावे यासाठी आयोजित केलेल्या पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि भव्य असे भीमा कृषी प्रदर्शनाला आज दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. 120 किलो वजनाचा बोकड, 2 फुटी गाय, 2 हजार किलो मीटर उडणारा पोपट, पावणेतीन फुटाचे नाचणारे घोडे हे प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे.

प्रदर्शनामध्ये गळदंगे रामनगर येथील तीन वर्षाचा 130 किलो वजनाचा बोकड खास आकर्षण ठरत आहे. शंकर पीसूत्रे हे त्यांचे मालक आहेत. हे बोकड बीटल जातीचे असून तो 130 किलो वजनाचा आहे. भारतातील सर्वात लहान गाय कुंगनूर जातीची जी 2.2 फूट उंचीची आहे. ती सहा महिन्यांची गाभन असून शिवाप्पा गणेश सावंत (सांगली) यांची ती गाय आहे.

यासह अनेक जनावरे प्रदर्शनाचे खास आकर्षण आहेत.

याचबरोबर प्रदर्शनामध्ये जाफराबादी गाय, लाल कंधारी गाय, पंढरपूर गायी, संकरित गायी, म्हैसी, जाफराबादी रेडा, उस्मानाबादी शेळी, अडीच ते पावणेतीन फुटाचे नाचणारे घोडे हे प्रदर्शनाचे खास आकर्षण आहेत. याचबरोबर कपिला गाय, कडकनाथ कोंबडी, ससे, पांढरे उंदीर तसेच कुक्कुट, इमू पालन वैशिष्ट्यपूर्ण चिनी कोंबड्या वेगवेगळे बैल, घोडे, कुत्री, पशुपक्षी विविध जनावरांच्या जाती पाहावयास मिळत आहेत. तसेच जनावरे व शेती साहित्य पाहण्यासाठी व खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत.

आम्हा शेतकऱ्यांना शेतीचे उपयुक्त साहित्य माहिती व जनावरे पाहण्याची संधी एकाच छताखाली भीमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून दरवर्षी मिळते. याही वर्षी माजी खासदार धनंजय महाडिक यांनी आम्हाला हे व्यासपीठ उपलब्ध केले व शेतीविषयक पूरक माहिती आम्हाला या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहण्यासाठी खुली करून दिली. हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी पर्वणी असल्याची प्रतिक्रिया प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी दिली आहे. तर या प्रदर्शनात सहभागी असलेल्या स्टॉलधारकांनीही चांगले प्रदर्शन भरविले असल्याची प्रतिक्रिया दिली.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.