श्रावणाच्या पहिल्या सोमवारी चिंबळीतील महादेव मंदिरात भक्तांची गर्दी
Updated On:

चिंबळी : श्रावण महिन्याला प्रारंभ झाल्याने खेड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील कुरूळी, मोई, चिंबळी आणि मरकळ परिसरातील महादेव मंदिरात पहिल्याच सोमवारी भक्तांनी, विशेषतः महिलांनी, दर्शनासाठी मोठी गर्दी केली. चिंबळी (ता. खेड) येथील प्राचीन महादेव मंदिरात सभामंडपातील नंदीला पुष्पहार अर्पण करून दही-दुधाने अभिषेक करण्यात आला. सकाळपासूनच महिलांनी महापिंडीला दही, दूध आणि बेलपर्ण वाहून दर्शन घेतले. या धार्मिक सोहळ्याने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.





